Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील (Aurangabad City) वाढत्या गुन्हेगारी आणि पोलिसांचा धाक कमी झाल्याचा आणखी एक उत्तम उदाहरण समोर आला आहे. कॉलेज आणि मित्रपरिवारात स्टाईल मारण्यासाठी बीबीएच्या विद्यार्थ्याने चक्क एक गावठी कट्टा विकत घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळताच सातारा पोलिसांना कट्टा, दोन जिवंत काडतुसांसह त्याला अटक केली आहे. तसेच या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन गणेश झळके (वय 22 वर्षे, रा. वळदगाव, ता. औरंगाबाद) असे अटकेतील विद्यार्थ्याचे नाव आहे. सोबतच चेतन झळकेसह अक्षय खंडागळे आणि पिंटू या दोघांचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन हा वाळूज परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. दरम्यान सातारा पोलीस ठाण्याचे प्रशांत निरीक्षक पोतदार यांना चेतनकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी तात्काळ सहायक निरीक्षक विनायक शेळके यांच्यासह पथकाला कारवाईचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचून चेतन झळकेला पकडले. 


पोलिसांनी ठोकल्या बेड्या


पोलिसांनी सापळा लावून चेतन झळकेला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे 30 हजार रुपये किमतीचा लोखंडी गावठी कट्टा आढळला. त्याची लांबी 17 सेंटिमीटर आणि रुंदी 5 सेंटिमीटर आहे. कट्ट्याच्या मुठीवर प्लास्टिकची काळ्या रंगाची दोन जिवंत काडतुसेही सापडली. पोलिसांनी त्यांच्याकडून 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, चेतनसह त्याला हा कट्टा पुरवणाऱ्या तिघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


स्टाईल मारण्यासाठी विकत घेतला कट्टा! 


चेतन हा वाळूज परिसरातील एका महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तर चेतन स्थानिक रहिवासी असल्याने कॉलेज आणि बाहेर मित्रांमध्ये तो स्टाईल मारत असतो. मात्र कॉलेज आणि मित्रपरिवारात आपली आणखी दहशत असावी आणि स्टाईल मारण्यासाठी गावठी कट्टा विकत घेण्याचं त्याने ठरवले. त्यानुसार त्याने 30 हजारांच्या दोन जिवंत काडतुससह एक गावठी कट्टा अक्षय खंडागळे आणि पिंटू (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याकडून विकत घेतला. त्यानंतर तो गावठी कट्टा दाखवत स्थानिक मुलांना धाक दाखवायचा. मात्र याची माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबाद म्हणावे की बिहार! गुन्हेगारी काही थांबता थांबेना, आता तर थेट रस्त्यावर लुटमार करत गाडी पेटवून दिली