Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलीस दलातील (Aurangabad City Police) सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP - Assistant Commissioner of Police) असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आज त्यांना अटक करुन, न्यायालयात हजर केले असता, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आपल्याच एका मित्राच्या 30 वर्षीय पत्नीचा ढुमे यांनी छेडछाड केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सिटी चौक पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ढुमे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय नेत्यांनी केली होती. दरम्यान आज सकाळी त्यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तर त्यांना न्यायालयात हजर केले असता, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ढुमे यांच्याकडून जामिनीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे प्रकरण!
पीडित महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह शहरातील सिडको परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होते. याचवेळी तिथे तिच्या पतीच्या ओळखीचे विशाल ढुमे तिथे आले होते. दरम्यान महिला आणि तिच्या पतीचे जेवण झाल्यावर ते निघत असताना, विशाल ढुमे आणि तिच्या पतीची भेट झाली. तसेच आपण गाडी आणली नसल्याने आपल्याला घरी सोडण्याची विनंती ढुमे यांनी महिलेच्या पतीला केली. ओळखीचे असल्याने महिलेच्या पतीने देखील होकार दिला.
मात्र गाडीत बसताच पुढच्या सीटवर बसलेल्या पीडित महिलेची मागे बसलेल्या ढुमे यांनी छेड काढायला सुरवात केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. घर येताच गाडीतून उतरून महिला आपल्या घरात गेली. दरम्यान ढुमे यांना घरी सोडण्यासाठी महिलेचा पती गाडीत बसले असतानाच, ढुमे यांनी मला तुमच्या बेडरूममधील वॉशरुममध्ये जाण्याचा हट्ट सुरु केला. यावेळी समजून सांगत असताना देखील ढुमे ऐकायला तयार नव्हते. तब्बल दीड तास ढुमे यांचा पीडित महिलेच्या घरासमोर गोंधळ सुरु होता. त्यामुळे अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी त्यांना तिथून घेऊन गेल्याने अखेर ढुमे यांचा गोंधळ बंद झाला, असं पीडित महिलेने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Aurangabad News : 'एसीपी'कडूनच महिलेची छेड, दीड तास सुरु होता राडा; पाहा औरंगाबादेत नेमकं काय घडलं