Aurangabad Crime News: कुणी आरोपी देता का आरोपी असे म्हणण्याची वेळ आता औरंगाबाद शहर पोलिसांवर आली आहे. कारण वेगवेगळ्या गुन्ह्यात तब्बल 2300 आरोपी फरार असून, त्यांना शोधण्यासाठी आता औरंगाबाद शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. विविध पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात पोलिसांना तब्बल 2 हजार 297 आरोपी हवे आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी 'विशेष पथक स्थापन करून, आता या आरोपी शोधण्याची जवाबदारी अधिकाऱ्यांवर दिली आहे.


औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत 17  पोलीस ठाणे आहे. त्यामुळे रोज विविध गुन्हे दाखल आहेत. अशात अनेकदा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार होतात. पोलीस त्यांना शोधून बेड्याही ठोकतात. मात्र बऱ्याचदा काही गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना शोधूनही मिळत नाही. मात्र औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत फरार आरोपींची संख्या तब्बल 2 हजार 297 झाली आहे. त्यामुळे आता या आरोपींना शोधण्याचे आव्हान  पोलीसांसमोर असणार आहे. 


असे असणार पथक...


फरार आरोपींच्या शोधासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना ठाण्यातील अनुभवी पाच अंमलदार देण्यात यावे, त्यांना ठाण्याची सेकंड मोबाईल गाडी देण्यात यावी. तसेच या पथकास अतिमहत्त्वाच्या बंदोबस्ताशिवाय दैनंदिन बंदोबस्त देण्यात येऊ नये आणि पथकातील कोणालाही गुन्ह्याचा तपास देऊ नये, तपास असेल तो इतर अधिकाऱ्यांकडे वर्ग करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 


पथकात कोण असणार?


पोलीस आयुक्तांनी नेमलेल्या पथकामध्ये सिटी चौकमध्ये उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार, क्रांती चौक सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे, वेदांतनगर उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, बेगमपुरा उपनिरीक्षक विक्रमसिंग चौहान, छावणी उपनिरीक्षक सचिन वायाळ, दौलताबाद सहायक निरीक्षक संजय गिते, एमआयडीसी वाळूज सहायक निरीक्षक गौतम वावळे, वाळूज उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, सिडको उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, एमआयडीसी सिडको उपनिरीक्षक सचिन जाधव, मुकुंदवाडी उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हर्सल उपनिरीक्षक शेख रफीक, उस्मानपुरा सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, पुंडलिकनगर उपनिरीक्षक संदीप काळे, सातारा उपनिरीक्षक शंकर शिरसाट, जवाहरनगर उपनिरीक्षक वसंत शेळके आणि जिन्सी ठाण्यात उपनिरीक्षक अनंता तांगडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.


आणखी काही महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: अत्याचार करतानाचा व्हिडिओ बनवला, गर्भवती राहिल्यावर...; वाळूज उद्योगनगरीतील भयंकर घटना


Aurangabad: भावकीतील नराधमाकडून अत्याचार, बदनामीच्या भीतीने गर्भवती राहिलेल्या तरुणीने संपवलं जीवन