Aurangabad Crime News: औरंगाबादच्या (Aurangabad) गारखेडा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केली आहे. आजाराला कंटाळून चाकूने स्वतःचा गळा चिरून घेत या वृध्दाने आपलं जीवन संपवलं आहे. ही घटना शहरातील गारखेडा परिसरातील भारतनगरजवळ असलेल्या साईनगर येथे घडली असल्याची माहिती पोलिसांनी (Police) दिली आहे. बापुराव विठोबा लिंगसे (80) असे आत्महत्या करणाऱ्या वृध्दाचे नाव असून, याप्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापुराव हे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. तर बापुराव यांना पाच मुली असून सर्वांचा विवाह झालेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी लिंगसे यांच्या पायाला मार लागला होता. त्यानंतर त्यांनी यासाठी अनेक दवाखान्यात उपचार केले. मात्र उपचार करूनदेखील वेदना कमी होत नसल्याने ते त्रस्त होते. त्यामुळे अखेर होणाऱ्या वेदनांच्या त्रासाला कंटाळून लिंगसे यांनी रात्री सव्वाबारा वाजता चाकूने स्वतःचा गळा चिरला.  


कुटुंबातील सदस्यांना बसला धक्का...


वेदनांच्या त्रासाला कंटाळून लिंगसे यांनी गळा चिरून घेतला. मात्र गळा चिरून घेतल्यानंतर होणारा त्रास असह्य होत असल्याने ते जोरात ओरडू लागले. लिंगसे यांच्या ओरडण्याच्या आवाज आयकून कुटुंबातील सदस्य जागे झाले. त्यांनी लगेच लिंगसे यांच्याकडे धाव घेतली. मात्र यावेळी लिंगसे यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांना धक्का बसला. कुटुंबीयांकडून तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.


Aurangabad: औरंगाबादमध्ये पुरोहिताची हत्या, घटनास्थळी आढळली चिलीमसह गांजाच्या झाडाची पाने


ऊसतोड मजुराची आत्महत्या


दुसऱ्या एका घटनेत गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे ऊसतोड मजूर म्हणून आलेल्या व्यक्तीने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. बाळू किशन पवार (वय 45, रा. धामगाव, ता. येवला) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.


दरम्यान मृत बाळू पवार यांनी ऊस तोडीसाठी दोन मुकादमांकडून पैसे घेतले होते. एका मुकादमाचे काम करण्यासाठी ते वाहेगाव येथे आले होते, तर दुसऱ्याने त्यांना पैशाचा सारखा तगादा लावला होता. त्यासाठी तो मुकादम बाळू पवार यांना फोन करून सारखा त्रास देत होता. त्या धाकानेच त्यांनी आपले जीवन संपविले, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.