Aurangabad Police News: औरंगाबाद शहर पोलीस (Aurangabad City Police) दलात सहायक पोलीस आयुक्त (ACP-Assistant Commissioner of Police) असलेल्या विशाल ढुमे (ACP Vishal Dhume) यांच्यावर एका महिलेची छेडछाड काढल्याप्रकरणी गेल्या महिन्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या घटनेने औरंगाबाद शहर पोलिसांची (Aurangabad City Police)  मान शरमेने खाली गेली होती. मात्र या प्रकरणाची चर्चा थांबत नाही तो आता पुन्हा एकदा एका पीएसआयने स्वतः राहत असलेल्या परिसरातील महिलांची मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. तर या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत महिलांचा जवाहर नगर पोलिस ठाण्यात ठिय्या पाहायला मिळाला. 


हॉटेलमध्ये भेटलेल्या एका मित्राला घरी सोडण्याची विनंती करत, गाडीत बसल्यावर त्याच मित्राच्या पत्नीची छेडछाड काढल्याप्रकरणी औरंगाबाद शहर पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त असलेल्या विशाल ढुमे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना 14 जानेवारीला समोर आली होती.  घटनेला महिना उलटत नाही तो, आता औरंगाबाद शहर पोलीस दलातील अनिल बोडले नावाच्या एका पीएसआयने महिलांची मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केले असल्याची तक्रार शहरातील जवाहर नगर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने एकच नव्हे तर परिसरातील अनेक महिलांसोबत गैरवर्तन केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. 


काय आहे प्रकरण? 


याबाबत पीडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी (17 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या भिंतीवर फुटबॉल जोरात मारल्याचे आवाज आल्याने त्या घराबाहेर आल्यात. त्यावेळी कॉलनीताल अनिल बोडले हे महिलेच्या भिंतीवर बॉल मारत होते. अनिल बोडले हे दारुच्या नशेत होते. तसेच पीडीत महिलेला पाहून आणखी जोरजोरात फुटबॉल मारायला लागले. मात्र महिलेने दुर्लक्ष केल्यावर बोडले शेजारील घराकडे गेला. तसेच कॉलनीत मोठ्याप्रमाणात आरडा-ओरड केला. त्यामुळे कॉलनीत महिला एकत्र जमल्या होत्या. तर महिलांना पाहून, बोडले अधिकच धिंगाणा आणिधमकी देऊ लागला. तसेच शिवीगाळ करत, मी छेडछाड केल्याचं कोण म्हणाले असे म्हणू लागले.  त्यामुळे महिलांनी डायल 112 वर फोन करून याबाबत माहिती दिली. पोलीस तत्काळ दाखल झाले आणि त्यांनी पीएसआय अनिल बोडले यांना ताब्यात घेतले. त्यानंतर महिलांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. 


संबंधित बातम्या: 


Aurangabad :  महिलेची छेड काढणाऱ्या औरंगाबादच्या एसीपी विशाल ढुमेंचं अखेर निलंबन