Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिस दलात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच चाकू हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चाकू हल्ला करणारा सुद्धा पोलिस कर्मचारीच आहे. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. व्यंकटेश केंद्रे असे हल्ला झालेल्या पोलीस अधिकारी यांचे नाव आहे.
केंद्रे हे जिन्सी पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख आहे. मंगळवारी पोलीस ठाण्यात त्यांना एक सामजिक संघटनेच शिष्टमंडळ भेटायला आले होते. शिष्टमंडळाकडून केंद्र सत्कार स्वीकारतच असताना शेख मुजाहिद नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने केंद्र यांच्यावर अचानकपणे चाकू हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. त्यांनतर केंद्र यांना तात्काळ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकुर्ती चिंताजनक...
केंद्र यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असून,पुढील काही दिवस काळजीचे असणार असल्याची सुद्धा माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
यामुळे केला हल्ला...
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुजाहिद एकदा नशेत असताना पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदाराला शिवीगाळ करत होता. म्हणून केंद्र यांनी त्याला झापून काढले होते. तसेच पोलीस ठाण्यात आलेल्या नागरिकांना योग्य वागणूक देण्याचा दम दिला होता. त्यामुळे आपला सर्वांसमोर अपमान झाल्याचा राग मुजाहिदच्या मनात असल्यानेच त्याने हा हल्ला केला असल्याची चर्चा आहे.
पोलीस दलात खळबळ...
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यावर पोलिस कर्मचाऱ्यानेच चाकू हल्ला केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. प्राथमिक माहितीनुसार ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे तो नशेच्या आहारी गेला होता. तसेच तो बटन गोळ्यांचा सेवन करत असल्याची चर्चा आहे. पण याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.