Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून, दुहेरी हत्याकांडाने (Double Murder) औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District) हादरलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून  हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. समीर विष्णु म्हस्के ( रा. भाग्यनगर, बाबा पेट्रोलपंपाचे जवळ, औरंगाबाद ) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचं निशात समीर मस्के नावं आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


आरोपी पोलिसांच्या ताब्यात...


औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात पतीने आपल्या पत्नीची आणि मुलीची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. तर आईनेच आपल्याला मुलाला हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचं आरोप आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. 


आईच्या सांगण्यावरून केली हत्या 


आरती मस्के यांच्या नातेवाईक संतोष सदाशिव सुतार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे.  समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 


Aurangabad: काकांची भेट घेऊन परतणाऱ्या पुतण्याच्या अपघातात मृत्यू, पत्नीसह आठ महिन्याची चिमुकली जखमी