Aurangabad Crime News: औरंगाबादच्या वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, अंदाजे 22 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह (Youth Dead Body) आढळून आला आहे. एका बंद पडलेल्या कंपनीत जमिनीत हा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच धड व मुंडके वेगळे करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीत पथेजा फोर्जींग नावाची कंपनी असून, गेल्या काही वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहे. कंपनी बंद पडली असल्याने परिसरातील काही लोकं कंपनीच्या जागेवरील भंगार साहित्य व मुरूमाचा उपसा करून घेऊन जातात. दरम्यान आज देखील काही लोकं तिथे गेल्यावर त्यांना एका खड्ड्यात तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. तर माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, एका खड्ड्यात तरुणाचा मृतदेह त्यांना आढळून आला. अधिक चौकशी केली असता मृतदेहाची धड आणि मुंडके वेगळं करण्यात आले आहे. तसेच मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. शिवाय मृतदेह असलेल्या तरुणाच्या अंगात शर्टही नव्हता. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या करून, मृतदेहाची ओळख पटू नयेत आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे देखील पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 


ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरु!


पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर हत्येचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यास सर्व गोष्टी समोर येतील असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर गुन्हे शाखेचे पाच आणि स्थानिक पोलिसांचे तीन असे एकूण आठ पथक मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे. 


खुनांच्या घटनेत वाढ! 


औरंगाबाद शहर पोलीस हद्दीत खुनांच्या घटनेत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 2022 या वर्षात औरंगाबाद शहरात 43 खुनाचे गुन्हे दाखल आहे. तर 48 खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाढत्या खुनाच्या घटना चिंतेचा विषय बनला आहे. 


Aurangabad News : 'एसीपी'कडूनच महिलेची छेड, दीड तास सुरु होता राडा; पाहा औरंगाबादेत नेमकं काय घडलं