औरंगाबाद : सध्या बहुतेक मोबाईल धारकांच्या मोबाईलमध्ये असणारं अॅप म्हणजे आरोग्य सेतू. कोरोनाचा रुग्ण शोधणारं ॲप किंवा कोरोनाबाबत नागरिकांना तात्काळ सतर्क करणारं ॲप अशी या ॲपची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात याचा आवर्जून उल्लेख केला होता. तसंच सरकारकडून हे अॅप वापरण्याबाबत आग्रह देखील केला जातोय. मात्र आता याच ॲपचे बनावट ॲप तयार करण्याचा पाकिस्तानी हॅकर्स प्रयत्न करत आहेत, अशी माहिती आहे.

केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आरोग्य सेतू ॲपची निर्मिती केली. आपल्या आजूबाजूला कुणी कोरोना रुग्ण आहे का याबाबत सतर्क करणारा ॲपची ओळख. अनेक लोकांनी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतला.

केंद्र सरकारचं आरोग्य सेतू ॲप हे आता पाकिस्तानी हॅकरच्या रडारवर आहे. अगदी हुबेहूब आरोग्य सेतू सारखे तयार करून ते भारतीयांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठीचे प्रयत्न देखील व्हाट्सअॅपच्या माध्यमातून केले जात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. तुमच्याही मोबाइलवरही आरोग्य सेतू ॲपची व्हाट्सअॅप लिंक आली तर ती लिंक तात्काळ डिलिट करा, ओपन करू नका. आपण जर ही ओपन केली तर आपल्या मोबाईलचा संपूर्ण ताबा हा पाकिस्तानी हायकर्स घेतील असा सायबर पोलिसांचा दावा आहे.

पाकिस्तानी हॅकर्सकडून आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड लिंक छेडछाड करीत बनावट आरोग्य सेतू ॲप तयार करून त्याची लिंक अनेकांच्या व्हाट्सअॅपवर पाठवली आहे. अनेकांकडून अशी बनावट व खोट्या लिंक एकमेकांना पाठवल्या जात आहेत. या बनावट लिंकद्वारे नागरिकांचा आणि भारतीय लष्कराचा संवेदनशील डाटा चोरीला जाण्याची शक्यता आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा लिंकद्वारे ॲप डाऊनलोड करू नये असे आवाहन नागरिकांना केलेला आहे. तसेच ज्यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करायचे आहे त्यांनी केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

कसं ओळखाल बनावट ॲप
बनावट ॲप ओळखणं सोपं आहे. या बनावट ॲपचे फाईल एक्सटेंशन डॉट एपीके (.apk) म्हणजे अँड्रॉइड ॲप्लिकेशन किट आणि ओरिजनल आरोग्य सेतू आपचे फाईल एक्सटेंशन डॉट ओआरजी डॉट इन(.org. in)असं आहे. त्याामुळे ॲप डाऊनलोड करताना ही काळजी घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

बनावट अॅपचा धोका
तुमचा फोनवरुन जर बनावट अॅप डाऊनलोड झाली तर तुमचा फोन हॅकर ऐकू शकतात. तुमचं व्हाट्सअॅपही चॅटही वाचू शकतात. व्हाट्सअॅपही कॉल ऐकू शकतात. तुमच्या सगळ्या इमेजेस पाहू शकतील.

हॅकर्सवर कारवाई करणार
हे सायबर क्राईम समोरचं मोठं आव्हान आहे. त्याचं कारण असं याचं सर्व्हर हे नेदरलँडमध्ये आहे. त्यामुळे ट्रॅक करणं हे मल्टिनॅशनल चॅलेंजिंग टास्क आहे. सैन्यदलातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप पोहोचले जाईल, यासाठी पाकिस्तानी हॅकर्सकडून खास प्रयत्न केले जात असल्याचे देखील सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आपल्यालाही अशी एखादी व्हाट्सअॅप वर आरोग्य सेतूची लिंक आली तर ती तात्काळ डिलीट करून सायबर सेलला तक्रार करा, असं त्यांनी सांगितलं आहे.