Aurangabad PFI : देशविरोधात कट रचल्याच्या आरोप असलेल्या पीएफआय संघटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायाधीश पीएफआयच्या रडारवर होते अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआय सदस्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी एटीएसने ही माहिती दिली आहे. तर पाचही आरोपींची न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
एटीएसकडून न्यायालयात माहिती...
या प्रकरणात आत्तापर्यंत 129 लोकं निष्पन्न झाले असून त्या सर्वांचा रोल वेग-वेगळा असून, त्याबाबत यांचे संबंध तपासायचे आहे. तर आरोपींकडून 10 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि एक हार्ड डिक्स मिळाली आहे.त्यातून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहे. त्यात कोणता आवाज कुणाचा आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. काही बँक स्टेटमेंट मिळाले आहे. ज्यात तामिळनाडूमधून ट्रांजेक्शन झाला असून, त्याची तपासणी करण्याची गरज आहे.
न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळली...
आज दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान औरंगाबाद जिल्ह्या न्यायालयात शेख इरफान, सय्यद फैजल, परवेज खान, अब्दुल हबीब आणि नासेर शेख यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी एटीएसकडून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजू आयकून घेतल्यानंतर पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता पाचही आरोपींची रवानगी हर्सूल कारागृहात होणार आहे.
न्यायालयात नातेवाईकांची गर्दी...
गेल्यावेळी न्यायालयाने पाचही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आज न्यायालयात काय होणार यासाठी आरोपींच्या नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळाली. तर एटीएससह स्थानिक पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त यावेळी पाहायला मिळाला. तर न्यायालयान कोठडीनंतर आता आरोपींकडून जामीनसाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या...
Maoist On PFI Ban: पीएफआयवरील बंदी म्हणजे फॅसिस्ट हिंदुत्ववादी अजेंडा; माओवाद्यांची सरकारवर टीका