Gulabrao Patil On Sanjay Raut : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) दिल्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट निवडणूक आयोगावरचं गंभीर आरोप केला आहे. धनुष्यबाणसाठी तब्बल दोन हजार कोटींची डील झाल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांच्या याच टीकेला आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. "संजय राऊतांनाच विचारा डील झालेले पैसे कुठं ठेवलेत?"असे गुलाबराव पाटील म्हणाले. 


आज (20 फेब्रुवारी) सकाळी औरंगाबाद विमानतळावर आल्यावर गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर धनुष्यबाणाची डील दोन हजार कोटी रुपयांत झाली असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला असल्याच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देतांना राऊत यांच्यावर निशाणा साधला. "संजय राऊतानांच विचारा डिल झालेले पैसे कुठे ठेवले आहेत, नोटा किती होत्या," असे पाटील म्हणाले. तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहेत असं विचारल्यावर, जाऊ द्या असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी खिल्ली उडवली. 


पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेणार!


गुलाबराव पाटील आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील शासकीय योजनांचा ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. तसेच पाणीपुरवठा विभागाबाबत ज्या काही तक्रारी असतील त्या दूर केल्या जातील. तसेच ज्या काही नवीन योजना सुरू होत आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आले आहेत, त्याचा आढावा घेतला जाणार आहे. सोबतच चांगलं चांगल्या योजनांना शाब्बासकी दिली जाईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.


काय म्हणाले होते संजय राऊत!


शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे जाताच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत थेट निशाणा साधला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच, हा प्राथमिक आकडा असून 100 टक्के सत्य असल्याच देखील राऊत म्हणाले आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


संबंधित बातमी


चिन्ह, नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा अन् व्यवहार झालेत; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप