Aurangabad School :  कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शाळा या कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीनं सुरू होत्या. आता ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते. काही शाळांना शनिवारी 'हाफ डे' दिला जातो. पण आता औरंगाबाद (Aurangabad) महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार. 


वीकेंडला देखील शाळेत जाणार विद्यार्थी


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या शाळा शनिवारी आणि रविवारीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता विद्यार्थी हे वीकेंडला देखील शाळेत जाणार आहेत. 


औरंगाबाद महापालिकेच्या 71 शाळा आहेत यात 13500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार आणि रविवारी शाळेला सुट्टी न देण्याचा निर्णय   औरंगाबाद महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत घेण्यात आला. 



इतर महत्त्वाच्या बातम्या:


Crime News : भाऊ झाला वैरी! 17 वर्षीय युवकाची चुलत भावाने केली हत्या


Mumbai Crime : वारंवार पैसे मागत असल्यामुळं नातवाला आला राग, बांबूनं मारहाण केल्यानं आजोबाचा मृत्यू


धक्कादायक! पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न


कुडाळमध्ये राणेंची प्रतिष्ठा पणाला; नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आघाडी विरुद्ध भाजपचा सामना


Gondia School : 'बाई आमची शाळा सुरु करा', तिसरीतील चिमुकलीचा जिल्हाधिकारी मॅडमना फोन


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI