Aurangabad Latetst News : औरंगाबादमध्ये स्थानिक निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये तू-तू मैं-मैं झाल्याचं समोर आले आहे.  औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीतशिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये तू-तू मैं-मैं झाले. 


औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून शिवसेनेच्यादोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मंत्री संदिपान भुमरे यांच्यामध्ये या निवडणुकीवरून तू-तू मैं-मैं झाली. औरंगाबाद जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष पदासाठी हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली. शनिवारी उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. त्यासाठी हरिभाऊ बागडे, मंत्री संदिपान भुमरे, आमदार अंबादास दानवे, काँग्रेस नेते कल्याण काळे यांनी एकत्र येऊन दिलीप निरपळ यांना उमेदवारी दिली होती. यावेळी अब्दुल सत्तार यांनी गोपालसिंग राजपूत नावाच्या ओबीसी नेत्याला संधी देण्याची विनंती केली. त्यांची विनंती धुडकावून लावत या दिलीप निरपळ यांना उमेदवारी देण्यात आली. अखेर आज झालेल्या निवडणुकीत दिलीप निरपळ यांचा विजय झाला. आणि सत्तार यांनी दिलेले उमेदवार गोकुळसिंग राजपूत यांचा पराभव झाला. 


आपण दिलेल्या उमेदवराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते अब्दुल सत्तार भलतेच संतापले होते. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, राज्यात ओबीसी उमेदवाराला संधी मिळत नाही.  त्या तिघांनीही संधी दिली नाही.  असा आरोप करत हरिभाऊ बागडे यांना सोडणार नाही, असे म्हटले. आपल्या पक्षाच्या मंत्र्यावरीही अब्दुल सत्तार यांनी तोफ डागली. भुमरे यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, शिवाय नाव न घेता त्यांची जागा हर्सूल जेल मध्ये असल्याचेही म्हणाले. एवढेच नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये पैठणमधून भुमरे सोडून नव्या उमेदवाराची मागणी पक्षाकडे करणार असल्याचे देखील सत्तार यांनी म्हटले आहे. 


मी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला, ते सत्तार यांना जिव्हारी लागलं असेल तर मी काय करणार. माझ्या विरोधात उमेदवार मागण्यापेक्षा सत्तार यांनीच माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. मी कट्टर शिवसैनिक आहे ,त्यामुळे शिवसेना काय हे सत्तार यांनी मला शिकवू नयेत, असे मंत्री संदिपान भुमरे म्हणाले. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live