Astrology Panchang 19 September 2024 : आज गुरुवार, 19 सप्टेंबरला चंद्र मेष राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून या तिथीला द्वितीया तिथीचं श्राद्ध केलं जातं. आज पितृ पक्षाच्या दुसऱ्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आज पितृ पक्षाचा दुसरा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांना विष्णूदेवाच्या कृपेने आज सर्व प्रकारचं सुख मिळेल. तुमच्या शब्दांचा इतरांवर प्रभाव पडेल आणि तुमचं सोशल सर्कलही वाढेल. आज नशिबाने साथ दिल्यास व्यावसायिकांना चांगले परिणाम मिळतील आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात. नोकरी करणाऱ्यांची अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. करिअरच्या प्रगतीसाठी तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील. आज कौटुंबिक वातावरण सुखाचं असेल.


कर्क रास (Cancer)


आज पितृ पक्षाचा दुसरा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कर्क राशीचे लोक आज आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस शुभ असेल आणि अनपेक्षित स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या आघाडीवर योजनांद्वारे तुम्ही चांगले यश मिळवाल. नोकरी करणाऱ्यांना अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि काम वेळेवर पूर्ण झाल्याचा आनंदही होईल. भावांमध्ये काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल.


सिंह रास (Leo)


आज म्हणजेच पितृ पक्षाच्या दुसऱ्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. सिंह राशीच्या लोकांना आज विष्णू देवाचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे त्यांना जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि त्यांनी आखलेली सर्व कामं सहज पूर्ण होतील. आज व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आज आपल्या कामात हुशारी दाखवतील, ज्यामुळे अधिकारी खूप खुश दिसतील. ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकेल. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवल्याने तुम्हाला आनंद होईल.


तूळ रास (Libra)


आजचा म्हणजेच, पितृ पक्षाचा दुसरा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिल्याने आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल. आज अचानक लाभामुळे तुम्हाला पैशांशी संबंधित कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. व्यापारी काल ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त नफा कमावतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज विष्णू देवासोबत पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मालमत्ता इत्यादींमध्ये गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. धनु राशीचे लोक आज खर्चाचे नियोजन करून पुढे जातील आणि पैशाची बचतही करू शकतील. प्रलंबित कामं पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. काही गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील, परंतु कुटुंबातील मोठ्यांच्या पाठिंब्याने काही काळानंतर ते सामान्य होईल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 19 September 2024 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य