अमरावती : काही लोकांनी सुपारी घेऊन मला पाडलं आणि अमरावतीला 10 वर्षे मागे लोटलं अशी टीका अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडूंवर केली. हे ढोंगी, नाटकबाज, सुपारी बहाद्दर असून त्यांनी तुम्हाला काही दिलं का असा सवालही त्यांनी विचारला. धोक्याला माफी नाही, याचा हिशोब हा होणारच असा इशाराही त्यांनी दिला. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात शक्ती फाउंडेशनच्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला तेलंगणाचे भाजप नेते टी राजा सिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.
या बहिणीचा हिशोब भाऊ करणार
माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यावर जहरी टीका केली. त्या म्हणाल्या की, शहर खूप कडू झालं आहे. काही सुपारीवाल्यांनी सुपारी घेतली आणि मला पाडलं. हैदराबादवरून टी राजा या माझ्या भावाने साथ दिली आणि काही भावांनी इथे राहून मला पाडायची सुपारी घेतली. मी हरले, माझा जिल्हा 10 वर्ष मागे गेला. ढोंगी, नाटकबाज, सुपारी बहाद्दर यांनी तुम्हाला काही दिलं का? आता या बहिणीचा हिशोब माझे भाऊ घेणार की नाही? धोक्याला माफी नाही, पूर्ण हिशोब होणार. जे भगव्यासाठी लढणार त्यांना शेवटपर्यंत मी साथ देणार. या बेईमांना हाकलल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही.
नवनीत राणांच्या पराभवाचा बदला घेणार
यावेळी बोलताना भाजपचे आमदार टी राजा म्हणाले की, नवनीत राणा माझी बहीण आहे. आता येथील जनता त्यांच्या पराभवाचा हिशोब घेणार. ही अर्धी जन्माष्टमी आपण साजरी करत आहोत. जेव्हा मथुरा पूर्ण आपल्याकडे येईल तेव्हा खरी जन्माष्टमी साजरी करणार. जे सांगत होते राम मंदिर होणार नाही अखेर ते झालं. ज्ञानव्यापी जेव्हा आपल्याकडे येईल तेव्हा खरी जन्माष्टमी साजरी करू. जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत कर्तव्य पार पाडा.
लव्ह जिहादला उत्तर द्या युवकांनो असं आवाहन करत टी राजा म्हणाले की, महाराष्ट्र नव्हे तर देशात हिंदूंच्या मुलींना फसवण्याचं काम सुरू आहे. मुलांना पैदा करण्याची मशीन आपल्या बहिणींना बनवत आहेत. धर्मचा प्रचार करायचा असेल तर विश्व हिंदू परिषद, RSS मध्ये सहभागी व्हा आणि लव्ह जिहादला ठोकायचं असेल तर बजरंग दलमध्ये सामील व्हा. आता हिंदू राष्ट्र होण्यासाठी कोणतीच ताकद रोखू शकणार नाही. योगीजी तेच काम करताय. याच महाराष्ट्राच्या धर्तीवर बाळासाहेब ठाकरे या वाघाने जन्म घेतला आहे.
टी राजा म्हणाले की, तुम्हाला कुठेही धर्माचे ज्ञान मिळणार नाही, ते फक्त RSS मध्ये मिळेल. औरंगजेबचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण होऊ दिलं नाही. आपण जे म्हणतो 'मुझे गर्व है हिंदू का' ते फक्त शिवाय महाराज यांच्यामुळे. लव्ह जिहाद म्हणजे 'प्यार के नाम पर धोका; आहे. फक्त मुलांना जन्म देण्याची मशीन म्हणून वापरून घेतात हे लक्षात ठेवा.
ही बातमी वाचा: