Amravati News : भारतीय जनता पार्टीच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी (BJP Amravati District President) राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांची नियुक्ती करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्षपदी (BJP Amravati City District President) विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे (MLA Praveen Pote) यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. 


खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्यावर नवीन जबाबदारी


या नवीन बदलांनुसार, राज्यातील नवीन जिल्हाध्यक्ष (BJP Amravati District President) आणि शहराध्यक्षांची (BJP Amravati City District President) टीम प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घोषित केली आहे. राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून शहर जिल्हाध्यक्ष पदी विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे यांची निवड करण्यात आली आहे. खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी 2009, 2014 मध्ये या सतत दोन टर्म अनुक्रमे वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. 


अनिल बोंडे यांची भाजपा अमरावती जिल्हाध्यक्षपदी वर्णी


डॉ. अनिल बोंडे (Dr. Anil Bonde) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात राज्याच्या कृषिमंत्री पदाचा पदभार सांभाळला. यासह भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस वर्तमान स्थितीत राज्यसभेचे खासदार म्हणून ते काम पाहत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्नांची जाण आणि भान असणारे डॉ. अनिल बोंडे सदैव आक्रमक भूमिका घेऊन जनसामान्यांना न्याय देण्यासाठी तत्पर असतात. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजपा अमरावती जिल्हाध्यक्षपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे.


तळागाळातील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा


तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टाची जाणीव असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिल्याने भारतीय जनता पार्टीत आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हाभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला संघटनात्मक अधिकाधिक बळकट करून लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला क्रमांक एकच्या स्थानी आणण्याचा संकल्प डॉ.अनिल बोंडे यांनी जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यावर बोलून दाखवला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amravati News : 'फडतूस मार्ग', उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था, ठाकरे गटाकडून रस्त्याचं नामकरण