Amravati News : अमरावती (Amravati) शहरातील रस्ते खड्डेमय (Pothole) झाले आहेत. येथील रस्त्यांची पार दुरावस्था झाली आहे. यावरून शिवसेनेचा (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट आक्रमक झाला असून येथे शिवसैनिकांनी आंदोलन केलं. शिवसैनिकांनी सरकारचा निषेध करत खराब रस्त्याला "फडतूस मार्ग" असं नाव दिलं आहे. अमरावतीमध्ये पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून शिवसेनेनं आंदोलन केलं. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था
अमरावती जिल्ह्यासह शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्ते खड्डेमय असताना महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल न घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाकडून विद्युत भवनासमोर आंदोलन करण्यात आलं.
शिवसेनेकडून 'फडतूस मार्ग' असं रस्त्याचं नामकरण
यावेळी राज्य शासनाचा निषेध करत या ठिकाणी राज्य शासनाचा फडतूस मार्ग असं खड्डेमय रस्त्याचं नामकरण केलं आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला "फडतूस मार्ग" नावाचे फलक लावण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था
सततच्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्हा आणि शहरातील रस्त्यांवरील डांबर अक्षरक्ष: वाहून जात आहे. यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहन चालकांकडून संपत्प प्रतिक्रिया येत असून रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातील रस्त्यांची ही दुरावस्था झाली आहे.
शिवसेनेचा "आता होवून जाऊद्या चर्चा" कार्यक्रम
अमरावतीमध्ये भर पावसात शिवसेनेचा "आता होवून जाऊद्या चर्चा" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र आणि राज्य शासनाच्या फसव्या आणि देखावेदार योजनांची पोलखोल या कार्यक्रमात करण्यात आली. राज्य सरकारच्या 'शासन आपल्या दारी, मग योजना कोणाच्या घरी', याची सविस्तर चर्चा कार्यक्रमात करण्यात आली. अमरावती येथील इर्विन चौक येथे शिवसेना ठाकरे गटाकडून आयोजन केलं गेलं. पण अमरावती शहरात सकाळपासून रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने भर पावसात कार्यक्रम पार पडला. पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या झाडाखाली कार्यक्रम घ्यायची वेळ आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Amravati News : MIDC तर्फे PM मित्र पार्कचं लोकार्पण, मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची उपस्थित