मुंबई : अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबाद न्यायालयाने समन्स पाठवले आहे. खासदार अससुद्दीन ओवैसी आणि त्यांच्या बंधूंच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात त्यांना न्यायालयाने समन्स पाठवलं आहे. या प्रकरणी 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात राणांनी उपस्थित राहावे असे आदेश आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी, 8 मे 2024 रोजी हैदराबादमध्ये प्रचारसभेत बोलताना, 15 सेकंद पोलिसांना हटवावं असं वक्तव्य करत त्यांनी ओवैसी बंधूंना आव्हान दिलं होतं. त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी 8 मे 2024 रोजी प्रचार सभा घेतली होती. त्यामध्ये बोलताना नवनीत राणा यांनी थेट असदुद्दीन ओवैसींवर निशाणा साधला. 2013 मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. त्या 15 मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला 15 सेकंद पुरेशी आहेत. पोलिसांना 15 सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या होत्या. राणांच्या याच वक्तव्याची दखल निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
नंतरही राणा त्यांच्या वक्तव्यावर ठाम
गुन्हा दाखल केल्यानंतरही नवनीत राणा त्यांच्या वक्तव्यावर ठाम राहिल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, "मी कुणालाही घाबरत नाही. माझ्या वक्तव्यावर मी नेहमीच ठाम राहिलेली आहे. ओवैसी यांनी 15 मिनिटं फक्त पोलिसांना हटवून आम्हाला द्या असं म्हटलं होतं. पण हा हिंदुस्थान आहे, जे लोक हिंदू विचारधारेचे आहेत, त्यांना 15 सेकंदच लागतील."
ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.
ही बातमी वाचा: