Bachchu Kadu, Amaravati : "भारतीय जनता पार्टीत गेलं की लवकर निवडून येता येते, काँग्रेसमध्ये निवडून येऊ शकत नाही. नाहीतर प्रहार आहेच, असं प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू म्हणाले आहेत. दोन मार्ग असतात एक गरीब आणि दुसरा श्रीमंतसाठी असतो. श्रीमंत समृद्धी महामार्गे जाईल आणि गरीब खड्ड्यातून जाईल, असंही कडू यांनी नमूद केलं. ते अमरावती येथे बोलत होते.
बच्चू कडू म्हणाले, काहीजण म्हणतात शिवाजी महाराज कुठं शिकले होते? पण तेव्हा शाळा नव्हती जिजाऊ सारखी माता होती. जिजाऊ ने सगळं शिकवलं. ज्ञान चोरता येऊ शकत नाही. एखाद्या शहिद कुटुंबातील महिलेच्या हाताने कार्यक्रम घेतला तर कोणीच येत नाही पण एक हिरोईन आणली तर तुटून पडतात. पुस्तकी ज्ञानापेक्षा गुणवत्ता पूर्ण शिक्षण महत्वाचं आहे. सावित्रीबाई फुलेंना चोरून - लपून विद्यार्थ्यांना शाळेत न्यावं लागतं होतं. मात्र, आता शाळा ओपन झाल्या आहेत. हा विचाराचा बदल आपण आणला पाहिजे. मुलांना फॅक्टरीमध्ये घातल्या सारखं करू नका. मेरिट म्हणजेच सर्वकाही नाही, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू, बच्चू कडूंचा महायुतील इशारा
मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांनी आमच्या लहान पक्षांसोबत चर्चा करावी. जेणेकरून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात. जागा वाटपाबद्दल काय निर्णय होतो? हे सांगावे अन्यथा आम्ही आमचा स्वतंत्र्य निर्णय घेऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. प्रमाणे लोकसभा भाजपला( BJP) महत्त्वाची आहे, तशीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुती मधील इतर लहान घटक पक्षांसोबत चर्चा करून आम्हाला कशा पद्धतीने समोर घेऊन जाणार आहात, जागा वाटपाबद्दल काय निर्णय होणार हे स्पष्ट करावं, असंही कडू यांनी नमूद केलं.
भाजप राणांचा पक्ष संपवणार
हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होतो असं नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचचं आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन निवडणूक लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. हिंदू शेरणी झाल्या आहेत. भाजप हे आता नवनीत आणि रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष देखील संपवणार आहे. भाजपमध्ये जाऊन त्यांचा स्वाभिमान संपला नाही पाहिजे, असेही यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या