Amravati Crime : अमरावतीवरून यवतमाळला क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणांच्या मिनी बस आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास अमरावती (Amravati News) जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर जवळ झाला आहे. या अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहे. सध्या गंभीर झालेल्यांना अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. 


चार तरुणांचा जागीच मृत्यू, 10 गंभीर जखमी


प्रथमिक माहितीनुसार, अमरावती येथील 14 तरुण आज सकाळी यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव खंडेश्वरच्या शिंगणापूरजवळ त्यांच्या मिनी बसला सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. हा धडक इतकी भीषण होता की, यामध्ये 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जमखी झाले आहेत. अपघातातील जखमी तरुणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर आता अमरावती शहरातील रिम्स हॉस्पिटलमध्ये या सर्व जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आपघातामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून सध्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आहे.


समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेल्या समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्या पासून कायम चर्चेत राहिला आहे तो त्यावर होणाऱ्या अपघातांमुळे. मात्र आता याच समृद्धी महामार्ग पुन्हा चर्चेत आला आहे तो या महामार्गाच्या सुरक्षा यंत्रणेमुळे. कारण डिझेल अभावी समृद्धी महामार्गावरील पोलीस गस्त पथक गेल्या 15 दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर अनावधानाने कुठला अपघात अथवा कुठली आपातकालीन परिस्तिथी निर्माण झाल्यास मदत पुरविणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला डिझेल पुरवठा होत  नसल्याने पोलिसांची वाहने गेल्या 15 दिवसांपासून जागेवरच आहे. त्यामुळे पोलिसांना समृद्धी महामार्गावर कुठला अपघात झाल्यास एमएसआरडीसीच्या रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागतो आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या