Garmin D2 Mach 1 aviator : गार्मिनने (Garmin) नुकतेच ‘गार्मिन डी2 मॅक 1’ (Garmin D2 Mach 1) हे स्मार्टवॉच वैमानिक आणि त्या क्षेत्राची आवड असणाऱ्यांसाठी बाजारात आणले आहे. या स्मार्टवॉचचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 11 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे, त्याचसोबत खासकरून वैमानिकांना उपयोगी असा हॅारिझॅान्टल सिच्युएशन इंडिकेटरसुद्धा (HSI) देण्यात आला आहे.
या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंच AMOLED डिस्प्ले टच सपोर्ट (TouchSupport) ऑप्शनसह देण्यात आला आहे. त्याचसोबत हार्टरेट मॅानिटर आणि मल्टी बॅंड फ्रिक्वेन्सी सपोर्ट हे फीचर्ससुद्धा देण्यात आले आहेत. अचूक GPS ट्रॅकींगसाठी मल्टी GNSS सिस्टीमही यात आहे.
गार्मिन डी2 मॅक 1 हे 2 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, ऑक्सफर्ड ब्राउन लेदरची किंमत $ 1.199 (₹90,900) आणि व्हेंटेड टायटेनिअम ब्रेसलेट किंमत $ 1.299 (₹ 98,400) असून, सध्या गार्मिन(Garmin) डी2 मॅक 1 हे फक्त अमेरिकेच्या बाजारपेठेमध्येच उपलब्ध करून दिले गेले आहे. मात्र, लवकरच ते जगभरात उपलब्ध करण्यात येईल, असे कंपनीने म्हटलं आहे.
Garmin D2 Mach 1चे फीचर्स:
* गार्मिन डी2 मॅक 1चे सगळ्यात खास वैशिट्य म्हणजे यामध्ये आपल्याला 1.3 इंच (416*416pi) AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, तो सफायर आणि टायटेनीयम वापरून बनवण्यात आला आहे. वैमानिकांसाठी विशेष श्रेणी असल्यामुळे त्यामध्ये GPS सोबतच मल्टी बॅंड फ्रिक्वेन्सी, मल्टी GNSS सिस्टीम आणि डायरेक्ट टु नेव्हीगेशन (direct to navigation) हे फीचर्स देण्यात आले आहेत. डायरेक्ट टु नेव्हीगेशन सहाय्याने आपण वर्ल्डवाईड aeronautical डेडाबेसच्या मार्फत इच्छित स्थळ गाठू शकतो. तसेच, च्युज नियरेस्ट एअरपोर्ट फंक्शनद्वारे आपल्या जवळच्या एअरपोर्टची माहितीही आपल्याला मिळते.
* या वॅाचमध्ये वैमानिकांना लागणारी महत्वाची माहिती, जसं हवामान METAR, TAF आणि MOS यासारखा डेटा, वाऱ्याची दिशा, दृक्ष्यमानता, बॅरोमिटर प्रेशर आपल्याला मिळते. अजून सांगायचे झाले तर वेळ, अंतर आणि समुद्रसपाटीपासूनची उंची याची माहितीसुद्धा आपल्याला यात मिळते. यामध्ये ऑफलाईन गाणी ऐकण्यासाठी आपल्याला 32GB पर्यंतची मेमरीसुध्दा मिळते.
* दुसरं महत्वाचे फीचर म्हणजे मिटीयोग्रॅम (meteogram). यामध्ये आपल्याला विशिष्ट विमानतळावरील हवामानाची माहिती, वाऱ्याची गती, ढगांची स्थिती MOS फोरकास्टद्वारे ग्राफ स्वरूपात मिळते. डी2 मॅक 1 हे विमानाचं उड्डाण, वेळ, अंतर आणि मार्ग याची माहिती गोळा करण्यास सक्षम असल्याचा दावा गार्मिनने केला आहे. हा सर्व डेटा flygarmin.com वर आपल्याला मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
* यात HSI कोर्स नीडलसुध्दा देण्यात आलयं, ज्यामुळे हवाई मार्गावर लक्ष ठेवता येतं. महत्त्वाच्या फ्युयल ट्रॅक आणि इतर कामांसाठी व्हायब्रेटींग अलार्मसुद्धा देण्यात आला आहे. या सगळ्या फीचर्ससोबतच आपल्याला स्मार्टवॉचमध्ये असणारे हेल्थ ट्रॅकींग फीचर्स हार्टरेट मॅानिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग आणि स्लिप मॅानिटरिंग हे देखील देण्यात आले आहेत. जीम, कार्डीयो, सायकलिंग, स्विमिंग अशा स्पोटर्स ॲक्टीविटीजसुद्धा यामध्ये ट्रॅक करता येतात.
* गार्मिन डी2 मॅक 1 हे ॲपल आणि अँड्रॅाईड स्मार्टफोन्सला सहजरित्या कनेक्ट होते. यामध्ये ब्लुटुथ(bluetooth) आणि वायफाय असे दोन्ही कनेक्टीव्हीटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हवाई प्रवासात GPS आणि pulse ox फीचर्ससोबत हे वॉच 24 तासांपर्यंतचा, तर एरव्ही 11 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.
हेही वाचा :
- Smart TV On Amazon : 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची 'ही' आहे सर्वात स्वस्त डील, ऑफरमध्ये मिळतेय चक्क 20 हजारांपर्यंत सूट
- Electric Car: देशात सर्वाधिक विक्री होणारी 'ही' इलेक्ट्रिक कार महागली, जाणून घ्या नवीन किंमत
- पॉवरफुल मोटर अन् अॅडवान्स बॅटरी; भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha