Leo Monthly Horoscope : सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असणार आहे. शत्रू सक्रिय होऊ शकतात, म्हणून तुम्हाला खूप सक्रिय राहण्याचा सल्ला दिला जातो. या महिन्यात इतरांवर कमी विश्वास ठेवावा. कार्य कोणतेही असो, ते कितीही सोपे असले तरी ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महिन्याच्या सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याशी वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर एखादा खटला सुरू असल्यास, या महिन्यात त्याची गती चांगली राहील, वकिलाच्या संपर्कात राहा. थोड्याशाही निष्काळजीपणामुळे बाजू कमकुवत होऊ शकते. भावनिकदृष्ट्या मजबूत रहा. तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्हाला मोठे यश मिळू शकते. प्रत्येकजण आपल्या युक्तीची प्रशंसा करेल.
आर्थिक आणि करिअर : या महिन्यात कामात आळस करू नका. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा बदलू इच्छित असाल, तर हा महिना अनुकूल आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी महिना चांगला राहील. धावत्या बैठका सुरु राहतील आणि अशा बैठकांमध्ये तुम्हाला महत्त्वाची भूमिका बजावायची आहे, तसंच स्वतःला खूप छान प्रेझेंट करायचं आहे. व्यवसाय क्षेत्रात इतर व्यवसाय करणारे लोक, जे तुमचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत, ते या महिन्यात कठीण आव्हान देऊ शकतात, अशा परिस्थितीत तुम्हीही खंबीरपणे स्पर्धा करावी. वस्तूंच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये, ग्राहकांची मागणी लक्षात घेऊनच तुम्ही नफा मिळवू शकता. महिन्याच्या अखेरीस तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल की, तुमच्या मेहनतीला यश आले आहे.
आरोग्य : यावेळी महिलांना तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल. कामामुळे चालायला वेळ मिळत नसेल, किंवा शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर त्यासाठी वेळ काढा. अन्यथा, शरीराला कॅल्शियम आणि D3 ची कमतरता भासू शकते. महिन्याच्या मध्यभागी, आहारात हंगामी फळे अधिक प्रमाणात खावीत, स्प्राऊट्स खाणे देखील फायदेशीर ठरेल. आहाराच्या गडबडीमुळे तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात. रात्रीच्या वेळी शक्यतो पचनास हलके पदार्थ खा. आहारात सॅलडचे सेवन वाढवा, त्याने फायदा होईल.
कुटुंब आणि समाज : महिन्याच्या सुरुवातीला कुटुंब आणि समाजाबाबत धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. पाहुणेही येतील, त्यामुळे त्यांच्या पाहुणचारात कुठेही कमतरता राहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. घरातील मोठ्यांसोबत वेळ घालवा, त्यांच्या गरजांचीही काळजी घ्या. वडिलांकडून नोकरीशी संबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. मूलं कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील, तर त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या समस्येवर उपाय शोधून द्या. या राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
- Taurus Monthly Horoscope (1 एप्रिल ते 30 एप्रिल) : कसा असेल वृषभ राशीसाठी एप्रिल महिना
- Virgo Monthly Horoscope : कन्या राशीच्या लोकांना मिळू शकते पदोन्नती, टूर-प्रवासाशी संबंधित नोकरी आणि व्यवसायातील लोकांनादेखील होईल उत्तम फायदा
- Aquarius Monthly Horoscope (1 एप्रिल ते 30 एप्रिल): कुंभ राशीच्या लोकांना रागावर ठेवावे लागेल नियंत्रण, जाणून घ्या कसा असेल संपूर्ण महिना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha