अकोला : अकोल्यात (Akola News) भंगार विक्रीतील (Scrap Scam) अपहार प्रकरणी महापारेषणनं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी  आठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.  2022 मधील एप्रिल महिन्यात अकोला आणि कारंजा येथील उपकेंद्रांचं हे भंगार होते. दोन्ही ठिकाणांवरील 85210  किलोपैकी 4775 किलो भंगाराची अफरातफर झाली होती. या भंगार विक्री प्रकरणात महापारेषणचे 8 जणांना निलंबित करण्यात आले.


 निलंबित लोकांमध्ये सहा अभियंते आणि दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महापारेषणचे अमरावती विभागाचे मुख्य अभियंता जयंत विखे यांनी ही कारवाई केलीय. कारवाई झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता रमेश वानखडे यांचा समावेश आहे.


निलंबित अधिकारी-कर्मचारी


1) रमेश कृष्णराव वानखडे : कार्यकारी अभियंता 
2) राहुल रामदास पाटील : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
3) दत्ता दिनकर शेजोळे : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
4) श्याम मेश्राम : अतिरिक्त कार्यकारी अभियंता 
5) गोपाल दिलीप लहाने : उपकार्यकारी अभियंता 
6) श्रीकांत टेहरे : उपकार्यकारी अभियंता 
7) सुरेश पेटकर : उपव्यवस्थापक वित्त व लेखा 
8) संजीत मेश्राम : उपव्यवस्थापक



अकोल्यातील महापारेषणच्या वीज उपकेंद्र आणि कारंजा उपकेंद्रात 2018 साली 852010 किलो वजनाचे भंगार होते.  मात्र 2022 साली भंगाराचे वजन केले असता तब्बल 4775 किलो कमी भंगार भरल्याची बाब समोर आली. ही बाब समोर आल्यनंतर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आठ जणांचे निलंबन करण्यात आले परंतु अद्याप काही प्रश्न अनुत्तरीत आहे. 


पोलीस चौकशी करण्याची मागणी


कारंजा येथील उपक्रेंद्रातून 4775 किलो भंगाराचा अपहार झाला. अपहार झाला तरी कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. जवळपास पाच टनाचे भंगार नेण्यासाठी ट्रकची आवश्यकता असते. ते भरण्यासाठी किमान 10 ते 12 मजूर लागतात. मात्र यासंदर्भात कोठेच कोणतीच नोंद नाही. तसेच अपहाराबाबत पोलीस चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे