अकोला : रायगड जिल्ह्यातील 'काशीद बीच' (Raigad Kashid Beach) येथे अकोला जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अकोला जिल्हा प्रशासनाकडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राम कुटे आणि आयुष रामटेके असं बुडालेल्या दोघांची नावे आहेत.
अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.
1) राम कुटे (वय 60 वर्षे) रा. अकोला, शिक्षक. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली PHC येथे पाठवण्यात आला आहे.
2) आयुष रामटेके (वय 19 वर्षे) रा. अकोला, विद्यार्थी. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड PHC येथे पाठवण्यात आला आहे.
3 ) आयुष बोबडे (वय 17 वर्षे) रा. अकोला हा विद्यार्थी सुखरूप आहे.
Kashid Beach Incident : नेमकं काय घडलं?
अकोल्यातील एका खासगी क्लासेस विद्यार्थी आणि शिक्षकांसह काही सहकार्यांची सहल रायगड जिल्ह्यातील काशीद बीच परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास ते सगळेजण समुद्राकाठी उतरले असता समुद्राच्या लाटेत वाहून गेले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेत शिक्षक राम कुटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला असल्याचं समजते आहे. आयुष बोबडे या 17 वर्षीय विद्यार्थीला वाचवण्यात यश आले असून तो सुखरूप आहे. तर आयुष रामटेके या 19 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.
आयुष रामटेके हा शिकवणी क्लासेसचा विद्यार्थी नसून शिक्षकांच्या घराशेजारील राहणारा तरुण होता, असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, फिरण्यासाठी सोबत आलेले शिकवणी क्लास मधील केवळ तीन विद्यार्थी होते आणि तिन्ही सुखरूप असल्याचे शिकवणी क्लासेसच्या शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे.
सदर घटना मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले आणि पुढील तपास चालू आहे.
ही बातमी वाचा: