Delhi Air Pollution AQI 400 :दिल्लीची हवा पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचली असून राजधानीतील वायूप्रदूषण (Air Pollution) सतत वाढत आहे. शनिवारी संध्याकाळी दिल्लीचा सरासरी AQI (Air Quality Index) 372 वर पोहोचला, जो 'अत्यंत खराब' श्रेणीत मोडतो. शहरातील अनेक भागांमध्ये हा निर्देशांक 400 च्याही पुढे नोंदवला गेला, ज्यामुळे नागरिकांना श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे.
सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डच्या SAMEER अॅपवरील आकडेवारीनुसार, दुपारचा 361 AQI काही तासांतच वाढून 372 झाला. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत अव्वल ठरली आहे.
Delhi Air Pollution: दिल्लीतील AQI 400 पार
राजधानीतील अलीपूर (417), आयटीओ (408), नेहरू नगर (407), पटपडगंज (403), पंजाबी बाग (404), विवेक विहार (415), वजीरपूर (424), बावाणा (424), बुराडी क्रॉसिंग (420) अशा अनेक ठिकाणी AQI 400 च्याही वर पोहोचला आहे. सर्वत्र धुरकट वातावरण, डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी वाढताना दिसत आहेत.
NCR Pollution Levels: एनसीआरचीही भीषण स्थिती
दिल्लीप्रमाणेच एनसीआरमध्येही हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. नोएडा 354, ग्रेटर नोएडा 336 आणि गाझियाबाद 339 अशा अत्यंत धोकादायक स्तरावर नोंदवले गेले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कमी वारा आणि हिवाळी हवा प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.
Delhi Air Quality Forecast: पुढील काही दिवस हवा अजून खराब
एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टमनुसार, पुढील काही दिवस दिल्ली आणि एनसीआरमध्ये हवा आणखी खराब राहण्याची शक्यता आहे.
CPCB Norms For Pollution : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डचे मानांकन कसे आहेत?
• 0–50: चांगलीहवा
• 51–100: संतोषजनक
• 101–200: मध्यम
• 201–300: खराब
• 301–400: अत्यंत खराब
• 401–500: गंभीर स्तर
सध्या दिल्लीतील हवा ही गंभीर श्रेणीला स्पर्श करत आहे.
ही बातमी वाचा:
