Sharad Pawar & Parth Pawar: पुण्यातील मुंढवा परिसरात अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 एकर जमिनीच्या मुद्द्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर दोषारोप झाले आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शनिवारी अकोल्यातील पत्रकार परिषदेत भाष्य केले. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी आहे, तर दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांची फक्त 1 टक्के मालकी आहे.  दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मग पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आला. यावर शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही. (Sharad Pawar in Akola)

Continues below advertisement

पार्थ पवार जमीन प्रकरण गंभीर आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे असं म्हणत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करुन वास्तव हे त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. तसेच मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील, त्याआधारे निर्णय घेतला असेल,असेही शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांना शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर पवार यांनी म्हटले की, कोण तेजवानी, आणखी कोण, यांची नावं मला माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच हे सगळं शोधून काढावे, असेही शरद पवार यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा

तेलही गेलं अन् तूपही गेलं; जमीन हातची गेलीच पण आता 42 कोटी भरावे लागणार, पार्थ पवारांच्या कंपनीला मोठा दणका