अकोला :  'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती', असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय आलाय अकोला जिल्ह्यातील आपोती गावातील वत्सलाबाई राणे या आजीला... 21 जुलैला या आजी अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे  देवदर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या मंदिराशेजारी असलेल्या पुर्णा नदीत पाय धुण्यासाठी उतरल्या. परंतु, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. यावेळी एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्नही केलाय. परंतु, त्यात त्याला यश आलं नाहीय. त्या रात्री त्या आजीचा शोध घेण्याचा प्रयत्न गावातील युवकांनी केला, परंतु यश आलं नाही. मात्र, काल  दुपारी 12 च्या सुमारास मुर्तिजापूर तालुक्यातील येंडली गावानजिकच्या पुर्णा नदीत एका गुराख्याला वाचवा, वाचवा असा आवाज आला. त्याने ती गोष्ट गावात सांगितल्यावर प्रशासनानं सूत्र हलवली. अन् पिंजरच्या संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध व बचाव पथकानं तिची पुराच्या पाण्यातून सुटका केली. वाहून गेल्यानंतर आजीला झाडाच्या एका फांदीचा आधार मिळाला होता. यानंतर तब्बल पुराच्या पाण्यात तब्बल 18 तास संघर्ष करत तग धरला. शेवटी आजीचा जीव वाचल्याने तिच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.


पुरात आजीबाई गेल्या वाहून, झाडाला पकडून 18 तास मृत्यूशी झुंज 


अकोल्यासह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. अशाच पूर्णा नदीलाही मोठा पूर आला. या पुराच्या पाण्यात वच्छलाबाई शेषराव राणे ही 60 वर्षांची आजीबाई वाहून गेली. मात्र सुदैवाने एका झाडाच्या फांदीला धरून आजीने या छोट्या झाडाचा आसरा घेतला. झाडाला पकडून आजी 18 तासांवर मृत्यूशी झुंज देत होती. पिंजरच्या संत गाडगेबाबा शोध आणि बचाव पथकाच्या मदतीनं या आजीला वाचविण्यात यश आले आहे.




अकोला जिल्ह्यातील आपोती येथील एक आजी अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन येथे दर्शनासाठी गेली. 21 जुलै रोजी ऋणमोचनला ही आजी गेली अन् पूर्णा नदीच्या काठावर पाय धुण्यासाठी उतरली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तसाच पाण्याचा अंदाज न आल्याने आजीबाई पूर्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असल्याने त्या दूरवर वाहून जात होत्या. ते पाहून संत गाडगे महाराज मंदिरावर उपस्थित असणाऱ्या एका युवकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना वाचवू शकला नाही. रात्री बराच वेळेपर्यंत त्यांचा शोध घेणे चालू होता. दुसऱ्या दिवशी ही आजी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालूक्यातल्या येंडली गावात सापडल्या. नदीपात्रात एका ओंडकाच्या सहाय्याने पुरात अडकल्या होत्या. काल जिल्हा प्रशासनाने तिच्या रेस्क्यूसाठी पिंजरच्या संत गाडगेबाबा बचाव आणि शोधपथकाला पाचारण केलं. या पथकाचे अध्यक्ष दिपक सदाफळे यांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करत आजींची पुरातून सुटका केली. 


येंडली परिसरात सापडल्या आजी  


अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील येंडली गावात काल 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बकऱ्या चारणाऱ्या युवकाला एक आजी पूर्णा नदीच्या पात्रात मधोमध एका छोट्या झाडाला आसरा घेऊन पकडून असल्याची दिसून आली. लागलीच बकऱ्या चारणाऱ्या दीपक कुरवाडे याने गावातील इतर लोकांना बोलावले. अन् त्यानंतर ज्ञानेश्वर वानखडे, सुरेश बावनेर, तेजस साबळेसह गावातील युवकांनी गाडगेबाबा बचाव पथकाच्या सहायाने तिची सुटका केली. आजीला दोरीच्या आणि हाताच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यादरम्यान, गावकऱ्यांनी त्यांना विचारलं असतं आजीबाई तुम्ही कुठच्या आहात, आणि कुठून आले. तेव्हा आजींनी ऋणमोचन येथून नदीत वाहून आले असल्याचे सांगितले. ऋणमोचन ते येंडली परिसराचे नदीचे अंतर हे सुमारे एक ते दीड किलोमीटर येते. 




आता आजी बहिणीच्या मुलाकडे भातकुलीला 


आजी 21 जुलै रोजी दुपारी सुमारे साडे तीन वाजता पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेली, सुदैवाने या आजीला ऋणमोचन पासून दीड किमी अंतरावर एका छोट्या झाडाचा आसरा मिळाला, अन् पूर्ण रात्र या झाडाच्या फांदीला पकडून राहिली, अशा प्रकार आजीने 18 तासांवर मृत्यूशी झुंज दिली. अखेर आजीला वाचवण्यात यश आले. सध्या आजी तिच्या बहिणीच्या मुलाकडे भातकुली येथे आहे. दरम्यान, तिचं गाव असलेल्या अकोला जिल्ह्यातील आपोती येथील तिचा मुलगा शंकर राणे याच्याशी 'एबीपी माझा'नं संपर्क केला असता तो अगदी नि:शब्द होता. आपल्या आईचा पुनर्जन्मच झाल्याचा आनंद त्याने आमच्याशी बोलतांना व्यक्त केला. त्याने आपल्या आईला वाचविणाऱ्या बचाव पथक आणि येंडली गाववासियांचे आभार मानलेत. 



संत गाडगेबाबा आपात्कालिन शोध व बचावपथकाचा जनसेवेचा 'सेवायज्ञ' 


 अकोला जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती आलीय, नागरिक कुठे अडकलेय... रुग्णाला तातडीने दवाखान्यात पोहोचवायचे... अडकलेल्या वन्यप्राण्याचे 'रेस्क्यू ऑपरेशन' करायचे... या सर्व संकटांवर उपाय फक्त आणि फक्त एकच नाव असतंय, ते म्हणजे 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक....अकोला जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीच्या हाकेला 'ओ देत' तात्काळ धावून जाणाऱ्या ध्येयवादी तरूणांचा हा संच. तब्बल 19 वर्षांपुर्वी म्हणजेच 2003 मध्ये अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या पिंजर गावातल्या दिपक सदाफळे या सामाजिक विचारांनी भारलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाने लोकांना जीवन देणाऱ्या या चळवळीची मुहूर्तमेढ रोवलीय. या चळवळीच्या जन्माला एक छोटी घटना कारणीभूत ठरलीय. दिपकच्या पिंजर गावातील एका व्यक्तीचा वेळेवर दवाखान्यात नेता आले नाही म्हणून मृत्यू झालाय. एक कुटुंब उघडं पडलंय. नेमके याच घटनेच्या अस्वस्थेतून दिपकने पुढचे आयुष्य लोकांना जीवन देण्याच्या कामात खर्ची घालण्याचा निश्चय केला. 


    त्याच्या या विचाराला गावातील 20 मित्रांनी उचलून धरलेय. अन 2003 मध्ये याच विचारातून जन्म झालाय 'गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथका'चा.... दिपकच्या आयुष्यावर राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज आणि गाडगे महाराजांच्या विचारांचा मोठा पगडा. याच विचारांवर ही चळवळ चालवायची, हा विचार त्यांनी आतापर्यंत कसोशीने अन निष्ठेने जपलाय आणि पाळला आहे. गेल्या 19 वर्षांपासुन एक रूपयांची सरकारी मदत न घेता या पथकाने निरंतर आपला सेवायज्ञ सुरू केलाय. सदाफळे यांच्या पथकात जवळपास 4000 तरुणांचा समावेश आहेय.ही सर्व मुलं सामान्य घरातील आहेय. यातील 230 मुलं एनडीआरएफच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित झाली आहेत. हे सारं ही मंडळी सेवाभाव म्हणून करतात. गाडीचं पेट्रोल अन त्याअनुषंगाने लागणारा खर्च कुणी दिला तरच