अकोला : अकोल्यातील (Akola News)  संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अकोटफैल परिसरात एका प्रेमविवाहावरून दगडफेकीची घटना घडली. दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या लोकांच्या घरावर दगडफेक झाली. पोलिसांनी संपूर्ण परिसराचा ताबा घेतला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रेमविवाह आणि अवैध धंद्याची वादाला किनार असून यातूनच एका गटाकडून दुसऱ्या गटाच्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती.


अकोल्यातील अकोटफैल भागात आज सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झालेत. काल रात्री दोन गट आमने-सामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. घटनास्थळी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सध्या अकोटफैल परिसरातील परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. आतापर्यंत 15 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलंय.


सहा महिन्यापूर्वीच झाली होती दंगल


 मिळालेल्या माहिनुसार,  अवैध दारूच्या दुकानावरून  आणि प्रेमविवाहावरून  ही घटना घडली आहे. अकोल्यात सहा महिन्यापूर्वीच दोन गटात दंगल घडली होतीय. यात एकाचा मृत्यू झाला होताय. पाच दिवस संचारबंदी होती. आता त्यानंतर पुन्हा दगडफेक झाली. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं, असे आवाहन करण्यात आले आहे.  


शहरातील परिस्थिती नियंत्रणात


अकोल्यात अलीकडच्या काळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अकोल्याचे पालकमंत्रीही आहेत. अकोल्यात सध्या  इतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे. 


हे ही वाचा :


अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार, सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र; म्हणाल्या, गृहमंत्री सपशेल अपयशी