अकोला :  लसणाची (Garlic)  फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. पण हीच फोडणी अकोल्यातल्या एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली असती. लसणाच्या जागी त्यांना सिमेंटचा गोळा फेरीवाल्याने विकला.अकोल्यात सिमेंटचा वापर करत बनवल्या लसणाच्या गाठी बनवल्याचा प्रकार समोर आलाय. आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत लसूणच्या गाठी बनवल्यात. हा लसूण सोलत असताना  पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या. त्यामुळे सदर लसूणच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता सिमेंटपासून तयार केलेल्या लसूणासारखी बनवलेला लसूण असल्याचे समोर आलंय. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून बनावट लसूणची विक्री होत असल्याचं समोर आलंय. 


अकोल्यात लसणाचा (लसूण) काळाबाजार करणाऱ्यांनी अजबगजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसूण विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातल्या बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


 सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतले. यात काही हुबेहूब ओरिजनल लसूणा सारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेल्या लसणाच्या पाकळ्या असल्याचे दिसून आल्या. लसूण सोलत असताना हा पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता सिमेंट पासून तयार केलेल्या लसणासारखी बनवलेला लसून असल्याचे समोर आले. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. 


तुम्ही खाताय बोगस लसूण?


भाजीची फोडणी असो किंवा वरणाची त्यात लसूण हा आलाच आहे. पण हाच लसूण तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. लसणासारखाच दिसत असला तरी हा लसूण नाही तर हा आहे सिमेंटचा दगड आहे.   जो अकोल्यात सर्रासपणे लसूण म्हणून विकला जातोय. अकोला शहरात फेरीवाल्यांकडून ही फसवणूक केली जाते. कधी मीठ, साखरेत प्लास्टिकचे तुकडे आढळतात. तर कधी तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदुळ मिसळून जिवाशी खेळ केला जातोय. त्यामुळे अशा बोगस विक्रेत्यांपासून सावध राहा आणि आरोग्य जपा..


Watch Video : पाहा सिमेंटने बनवलेला लसूण 



हे ही वाचा : 


पोलीस माग काढत सांगलीतील 'त्या' घरापर्यंत पोहोचले, आत घबाडही सापडलं, पण थोड्याचवेळात...