Agriculture News : राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणी पेरणीच्या (Sowing) कामांना वेग आला आहे. तर जिथं अद्याप कमी पाऊस झालाय, त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे. याजिल्ह्यात फक्त 12 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 


एकीकडे यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यानं 77 टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं फक्त 12 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अकोला जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. तर अकोल्यात जुलैचा पहिला आठवडा संपला तरीही म्हणावा तसा पाऊस पडला नाही.  त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.


अमरावती विभागातील पेरणीची स्थिती


जिल्हा     पेरणीचं एकूण क्षेत्र (हेक्टर)        झालेली पेरणी    टक्केवारी


अमरावती  6821.47                            2670.28            39.1
अकोला    4431.28                            527.25               11.9
वाशीम     4053.60                             2040.89            50.3
यवतमाळ  9008.90                            6906.41            76.7
बुलडाणा     7355.20                          1540.25            20.09


पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे हंगाम वाया जाण्याची भीती 


अकोल्यात कमी पावसामुळं शेतकरी हवालदिल झालाय. जुलैचा पहिला आठवडा संपल्यावरही पुरेसा पाऊस झालेला नसल्यामुळे हंगाम वाया जाण्याची भीती  शेतकऱ्यांना सतावतेय. तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. या आठवड्यात पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला एकच आस आहेय ती म्हणजे पावसाची. 


राज्याच्या काही भागाज जोरदार पाऊस


राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. हवा तेवढा पाऊस नसल्यानं काही भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यात 10 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, 18 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड