भारतीय वायूसेनेने 8 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या 88 व्या वायुदिनाच्या आधी मंगळवारी गाझियाबादच्या हिंडन हवाई तळावर विमानाच्या कवायतींची सुसज्ज अशी रंगीत तालीम केली. या कवायतीत नव्याने दाखल झालेल्या राफेल विमानासह तेजस LCA,जग्वार, मिग 29,,मिग21, आणि सुखोई यांचादेखील समावेश होता. गेल्या काही महिन्यांपासून लडाखच्या सीमेवर चीनबरोबर सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुसेनेत 10 सप्टेंबर रोजी राफेल या लढाऊ विमानांना वायुदलात औपचारिकरित्या प्रवेश दिला.
Mi17V7, ALH मार्क-4, चिनूक, Mi-35 आणि अपाचे हे हेलिकॉफ्टर देखील या फ्लाय पास्टचा भाग होते अशी वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की C-17, C-130, डॉर्नियर आणि DC-3 डकोटा ही विमानेदेखील या तालीमीचा भाग होते.


सुर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि सारंग एरोबॅटिक टीमदेखील या फ्लाय पास्टचा भाग होते. भारतीय वायुसेनेची स्थापना 1932 साली झाली आहे. या वर्षी भारतीय वायुसेना 88 वा वर्धापनदिन साजरा करणार आहे.
भारतीय वायुदल आपल्या नेक्स्ट जनरेशन स्टेल्ट फिचर असलेल्या अॅडवान्स कॉंबॅट एअरक्राफ्टची संख्या वाढवायचा विचार करता आहे. अशा प्रकारची दोन वेगवेगळी इंजिने असलेली टु वर्जन पावरची किमान 125 विमाने असावी असा विचार सुरू आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वायुदल प्रमुख आरकेएस भदोरिया म्हणाले की वायुदल अशा प्रकारची दोन वेगळी इंजिन असणारी सात स्कॉड्रन म्हणजे 125 विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे.
अधिकृत स्त्रोतांच्या माहितीप्रमाणे पहिली दोन स्कॉड्रनस् हे जनरल इलेक्ट्रीक414 व 90 KN दाब अशी वैशिष्ट्ये असलेल्या बाहेरुन आयात केलेल्या इंजिनांनी समृध्द असतील. ही इंजिने अमेरिकी हवाई दलाच्या विमानांसारखी आहेत. ही विमाने बोईंगने बनवली आहेत.
उरलेली पाच स्कॉ़ड्रन ही 125 KN इतका दाब असलेली भारतीय बनावटीची असतील. नव्या प्रकारची ही इंजिने विकसीत करण्यासाठी परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी केली जाईल. शक्तिमान इंजिनांमुळे विमानाचा वेग वाढतो आणि शस्त्रास्त्रे वाहण्याची क्षमताही वाढते.
यासंबंधी DRDO मटेरिअल, पेंट आणि स्ट्रक्चर यासंबंधी त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधन आणि विकास करत आहे. फ्लाईट नियंत्रण, एअरोडायनॅमिक्स, आराखडा याबरोबरच त्याचे ब्रेक्स, हायड्रॉलिक्स आणि इंधन व्यवस्थेवर स्वतंत्र अभ्यास सुरू आहे.
या आराखड्यानुसार अशा प्रकारचे पहिले विमान हे 2027 साली तयार होणे अपेक्षित आहे आणि याचे पूर्ण क्षमतेने उत्पादन हे 2029 साली सुरू होणे अपेक्षित आहे. IAF, हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., एअरोनॉटिक्स डेवलपमेंट एजन्सी आणि DRDO या आराखड्याच्या विकासाचे काम करणार आहेत.
या विमानांना सुपरसॉनिक वेग देण्याचा प्रयत्न असणार आहे. AMCA टीम याच्या स्टेल्थचे रेखांकन करताना भूमितीय रेखांकनाचा वापर करणार आहे तसेच जेणेकरुन ही विमाने रडारच्या नजरेतून वाचतील.