नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात आज संध्याकाळच्या सुमारास तब्बल दोनशे फूट खोल असलेल्या बायोगॅसच्या शोष खड्ड्यात मांजर पडलं. मांजरीला वाचवण्यासाठी एक जण खाली उतरला असता तोही अडकला आणि त्यानंतर एका मागे चार जण एकमेकांना वाचवण्यासाठी त्या खड्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी या विहिरीजवळ धाव घेतली. मात्र शोष खड्ड्यात शेणाचं प्रमाण जास्त असल्याने शोधकार्य अद्यापही सुरूच आहे. 

Continues below advertisement

प्रशासन व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले मात्र सामानाची उपलब्धता नसल्याने शोष खड्ड्यात पडलेल्यांना बाहेर काढणं अवघड झालं आहे. रात्रीच्या वेळेस अंधार पडल्याने लाईटची व्यवस्था करत पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केला आहे. या खड्ड्यात पडलेले सगळे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली असून नेमका हा सगळा प्रकार कसा घडला हे तपासांती समोर येईल. मात्र सध्या या खड्ड्यात पडलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 

नेमकं प्रकरण काय?

बायोगॅसच्या या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता.मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 4 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले.

Continues below advertisement

संबंधित बातम्या:

मांजरीचा आवाज, 200 फूट बायोगॅसचा खड्डा; मदतीला धावले अन् नको ते घडले, थरकाप उडवणारी घटना!

'या' गावातल्या प्रत्येक घरात मोफत बायोगॅस, वाचा गावाचं कल्याण करणाऱ्या 'गगनदीप'ची गाथा