मांजरीचा आवाज, 200 फूट बायोगॅसचा खड्डा; मदतीला धावले अन् नको ते घडले, थरकाप उडवणारी घटना!
एका मांजरीचा जीव वाचवताना अहमदनगरमध्ये सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यात (Biogas Pit) बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसदर ठिकाणी 200 फूट खोल विहिरीचे रुपांतर बायोगॅस प्रकल्पात करण्यात आले होते. त्यामुळे या खड्ड्यात बुडालेल्या लोकांना बाहेर काढणे, मोठे आव्हान आहे.
बायोगॅसचा हा खड्डा शेणाने भरलेला असल्याने बुडालेल्या लोकांच्या नाकातोंडात शेण गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?- बायोगॅसच्या या खड्ड्यात एक मांजर पडली होती. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एकजण मांजरीला बाहेर काढण्यासाठी बायोगॅसच्या खड्ड्यात उतरला होता. हा खड्डा पूर्णपणे शेणाने भरला होता.
मांजरीला वाचवताना हा व्यक्ती खड्ड्यात पडला. ही गोष्ट आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात येताच ते संबंधित व्यक्तीला वाचवण्यासाठी धावले. मात्र, त्याला वाचवण्याच्या नादात आणखी 5 जण बायोगॅसच्या खड्ड्यात पडले.