अहमदनगर : एकदा निवडणूक लागू द्या, माझ्यावर आरोप- टीका करणाऱ्यांच्या अंगावर मी कपडेसुद्धा ठेवणारा नाही. साडेचार वर्ष माझ्या विरोधकांनी काय काय लफडे केले याचे व्हिडिओ शूटिंग देखील माझ्याकडे आहे असं म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. अहमदनगर (Ahmednagar) तालुक्यातील पोखर्डी येथे खासदार निधीतून होत असलेल्या विविध विकास कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.


भाजप खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) तसेच भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. एकमेकांवर टीका आणि आरोपही त्यांच्यात सुरू असतात. त्यामुळे सुजय विखेंचा रोख हा आमदार निलेश लंके आणि आमदार राम शिंदे यांच्याकडे तर नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय.


काय म्हणाले सुजय विखे पाटील? 


माझ्यावर आरोप- प्रत्यारोप होतात, पण आरोप करणाऱ्यांनी मागील साडेचार वर्षात काय केले उत्तर माझ्याकडे आहे. कुणाचं खातं कोणत्या बँकमध्ये आहे, कोण कुठं जातं, कोण रात्री कधी बाहेर पडतं, कोण कुणाच्या घरी जातं, माझ्याकडे सर्व व्हिडीओ शूटिंग देखील आहे. वेळ आल्यावर ते मी दाखवेन असं सुजय विखेंनी म्हणत एक प्रकारे विरोधकांना गर्भित इशाराच दिला आहे. 


नगरच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच 


अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतंय. भाजपच्या सुजय विखेंच्या सोबत या ठिकाणी त्यांच्याच पक्षाचे आमदार राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांपेक्षा सुजय विखेंना आता महायुतीतील सहकारी पक्षांच्या नेत्यांसोबत पहिला लढावं लागणार असल्याचं चित्र आहे. 


असा कुठे नेता असतोय का? निलेश लंकेंचे सुजय विखेंना प्रत्युत्तर 


काही लोक आपण 50 वर्षांपासून राजकारण करत असल्याचं सांगतात, पण 50 वर्षांपूर्वी लोकांना दिलेलं आश्वासन आजही देत आहेत, असा कुठे नेता असतो का? असं सनसनीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांना दिलं आहे. दिवाळीच्या फराळ कार्यक्रमावरून सुजय विखेंनी निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.  


ही बातमी वाचा: