Gold Crown Donated to Sai Baba : शिर्डीतील (Shirdi) साईबाबा देश-विदेशातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. साईबाबांच्या झोळीत साईभक्त आपल्या परीने भरभरुन दान देत असतात. आज हैदराबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करत सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा 742 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला आहे.


साईबाबांच्या दरबारात सामान्य भक्तापासून व्हीआयपी भक्त हजेरी लावतो. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्ष सर्व भक्तांची असते. ज्या भक्तांना आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या असं वाटंत ते साईंच्या झोळीत आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे दहा रुपयांपासून ते लाखो रुपयांच दान टाकतात. आज माध्यान्ह आरतीला हैदराबाद येथील डॉ रामकृष्ण मांबा आणि श्रीमती रत्ना मांबा यांच्या परिवाराने हजेरी लावून श्री साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 1992 साली साईबाबांना केलेल्या नवसाची फेड म्हणून सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा 742 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केला.


गुरुपौर्णिमा उत्सवात साईचरणी कोट्यवधीचं दान
शिर्डीतील (Shirdi) साई बाबा मंदिरात (Sai Baba Temple) पार पडलेल्या गुरुपौर्णिमा (Guru Purnima) उत्सावात साईचरणी कोट्यवधीचं दान प्राप्त झालं. उत्सवाच्या तीन दिवसात साई भक्तांनी पाच कोटी 12 लाख रुपयांचं भरभरुन दान दिलं. या उत्सवात तीन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. गुरुपौर्णिमा उत्सवात साई चरणी एकूण 5 कोटी 12 लाख रुपयांचे दान प्राप्त झालं. यामध्ये दानपेटी - 2 कोटी 17 लाख रुपये, देणगी काऊंटर - 1 कोटी 59 लाख रुपये, ऑनलाईन डोनेशन - 1 कोटी 36 लाख रुपये, 12 देशांचे 19 लाख रुपयांचे परकीय चलन, 22 लाख 14 हजारांचे 479 ग्रॅम सोने आणि 3 लाख 22 हजार रुपये किमतीची 6 किलो 800 ग्रॅम चांदीचा समावेश आहे.


संबंधित बातम्या