अहमदनगर : भारतातील विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा. नाहीतर भारताचा संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात आणि तिथे लिंबू मिरच्या लावतात, अशी तुफान फटकेबाजी नितेश कराळे (Nitesh Karale) मास्तरांनी केली आहे. मिरजगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 


नितेश कराळे म्हणाले की, रोहित पवारांच्या (Rohit Pawar) रूपाने या मतदारसंघाला तीन आमदार मिळाले आहे. स्वतः रोहित पवार, त्यांचे वडील आणि त्यांच्या मातोश्री. रोहित पवारांचे आई-वडील देखील 24 तास या मतदारसंघासाठी काम करत आहेत, असे कौतुक त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्या कुटुंबियांचे केले. 


भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन्...


ते पुढे म्हणाले की, ट्रम्प जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या पत्नीने दिल्लीतील शाळा बघण्याचा आग्रह धरला होता. पण दाढीवाल्या बापूने (मोदींनी) त्यांना म्हटलं की दुसऱ्या शाळा पाहू. पण, ट्रम्प यांच्या पत्नीने आग्रह धरल्याने दिल्लीच्या शाळा दाखवल्या. त्यांनी पण आश्चर्य व्यक्त केलं होतं. भारतातील विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ राहा, नाहीतर भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात आणि तिथे लिंबू मिरच्या लावतात, अशी फटकेबाजी त्यांनी यावेळी केली.  


मी देखील जिल्हा परिषद मटेरिअल : नितेश कराळे


तुमच्या मतदारसंघात जो बदल झाला, तो रोहित पवारांमुळे झाला आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत रोहित पवारांनाच निवडून द्या. रोहित पवारांसारखा आमदार राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला मिळावा. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तुफान असतात. मी देखील जिल्हा परिषद मटेरिअल आहे. जे नॉलेज कॉलेजमध्ये शिकायला मिळत नाही ते व्हिलेजमध्ये शिकायला मिळते. त्यामुळे खेड्यातील मुलांनी कमीपणा वाटून घेऊ नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


मनीष सिसोदियांकडून रोहित पवारांचं कौतुक


दरम्यान, रोहित पवार यांचे आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी तोंडभरून कौतुक केले. रोहित पवार यांच्यासारखा आमदार तुम्हाला मिळाला हे तुमचं सौभाग्य आहे, कोणता आमदार शिक्षणासाठी कोणी प्रयत्न करत नाही, रोहित पवार पुर्ण ताकतीने शिक्षणासाठी प्रयत्न करताना दिसत आहे, ते आताच इतका प्रयत्न करतात तर विचार करा रोहित पवारांसारखा शिक्षणमंत्री महाराष्ट्राला मिळाला तर मुलांचे भविष्य उज्ज्वल बनेल, ते शिक्षणासाठी किती काम करतील. या आमदाराला कधी गमावू नको, आमदार रोहित पवार हे खूप कामाचे आहेत, चांगला माणूस आहे, यासाठी नाही तर तुमच्या मुलांचं उज्वल भविष्य हा आमदार घडवू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Rohit Pawar : गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीसांनी उभे केलेले चॉकलेट बॉय; राजेंद्र राऊतांवरही बोलले रोहित पवार