Nilesh Lanke on Sujay Vikhe : ज्यांना आपण आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवले त्यांनी पाच वर्षात एकदाही शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. एकीकडे म्हणायचे 50 वर्ष या जिल्ह्यात आमची सत्ता आहे. पण, एखादा तरी चांगला प्रोजेक्ट तुम्ही आणला का? असा घणाघात अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजप उमेदवार सुजय विखेंवर (Sujay vikhe) केला आहे.  


निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आज राहुरीत (Rahuri) सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतून निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. निलेश लंके म्हणाले की, मतदारसंघातील गोर-गरीब लोकांचे अश्रू पुसण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. देशात लोकशाही टिकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालीये. 


शेतकरी सुखी कसा होणार?


एकेकाळी आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जात होते. पण याच देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. शेती मालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या (Farmers) दुधाला भाव नाही. शेतकरी कसा सुखी होणार आहे? असा सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे. 


समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल


ज्यांना आपण आपले प्रश्न मांडण्यासाठी संसदेत पाठवले त्यांनी पाच वर्षात एकदाही शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. समोरच्या उमेदवाराचे काम म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल असं आहे. एकीकडे म्हणायचे 50 वर्ष या जिल्ह्यात आमची सत्ता आहे. पण, एखादा तरी चांगला प्रोजेक्ट तुम्ही आणला का? असा घणाघात निलेश लंके यांनी सुजय विखेंवर केला आहे. 


शेतकऱ्यांसाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गुंड का?


सुजय विखे म्हणतात आमची गुंडगिरी मोडून काढू. पण, माझ्या विवरण पत्रात माझ्यावर केवळ एक गुन्हा दाखल आहे. तो पण शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा म्हणून केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आहे. शेतकऱ्यांसाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गुंड का? असा सवालदेखील निलेश लंके यांनी सुजय विखेंना केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


ना कुठला बडेजाव, ना कुठला भपका; निलेश लंकेंच्या साधेपणाने मनं जिंकली, दिव्यांग बांधवाच्या हस्ते भरला उमेदवारी अर्ज


विरोधकांची 'लंका' दहन करा, नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा निलेश लंकेंवर हल्ला, सुजयचा विजय पक्का असल्याचा विश्वास!