Ahmednagar Lok Sabha Constituency : सुजय विखे (Sujay Vikhe) अतिशय चाणाक्ष आणि सक्रीय खासदार आहे. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे. आता 'नो लंके ओन्ली विखे', ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवर (Nilesh Lanke) केली आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, भर उन्हात आपण इथे इतक्या मोठ्या संख्येने इथे सुजय विखेंच्या पाठीशी उभे राहिलात म्हणजे सुजय विखेंचा विजय निश्चित आहे. म्हणून आज सुजय विखे एक तरुण युवा नेता म्हणून येथे काम करतोय. लोकसभेत अनेक प्रशांना सुजयने वाचा फोडली आहे.
आता 'नो लंके ओन्ली विखे'
खरं म्हणजे सुजयचे पंजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचे बीज रोवले आहे. बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्याचा वटवृक्ष केला. आता ती परंपरा सुजय विखे पुढे चालवत आहे. त्यामुळे खऱ्या प्रत्येक घटनेत सुजय विखे हे लोकांसोबत असतात. सुजयला इथल्या सर्व भागाची जाण आहे. या मतदारसंघातले प्रश्न ते हिरीरीने मांडतात. मतदार हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागे उभा राहतात हा नगरचा इतिहास आहे. विरोधकांच्या लंकेचं दहन करायचे आहे. आता "नो लंके ओन्ली विखे", ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका त्यांनी निलेश लंकेंवर केली आहे.
सुजय विखेंना मत म्हणजे मोदींना मत
ते पुढे म्हणाले की, मोदींच्या नखाची सर देखील इंडिया आघाडीला येणार नाही. राहुल गांधींचे (Rahul Gandhi) 50 वर्षात लॉन्चिंग झालं नाही, ते काय देश चालवणार? या देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार केवळ मोदींना आहे. दूध पिणाऱ्या मुलाला विचारलं तर सांगेल फिर एक बार मोदी सरकार. येत्या निवडणूकीत विरोधकांना पाणी पाजायचे आहे. त्यामुळे निवडणूकीत सुजय विखेंना मतदान करा. सुजय विखेंना मत म्हणजे मोदींना मत, असेही ते यावेळी म्हणाले.
आणखी वाचा