Satyajit Tambe Meets Ajit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं महायुतीचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री कोण मिळणार, मंत्रीपदाची लॉटरी कोणा कोणाला लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी देखील वाढल्या आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचं भाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत भेट घेतली. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या पराभवावर अजित पवार यांनी दुःख व्यक्त केल्याचे सत्यजित तांबे म्हणाले.
संगमनेरचा निकाल धक्कादायक
आमदार सत्यजित तांबे यांनी आद उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. संगमनेरचा निकाल धक्कादायक लागला आहे. 40 वर्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं. ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं असेल ते का केलं असेल? असा सवाल देखील सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलाआहे. अजित पवारांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवामुळे दुःख व्यक्त केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. जे टिंगल करत आहेत त्यांनी वरिष्ठांनी केलेलं काम दुर्लक्षित करु शकत नाहीत. खुनशी विचार कुणाच्या मनात असू नयेत. जर अशोक चव्हाण असा विचार करत असतील तर चुकीच आहे. राजकारणी माणूस विसराळू असायला हवा. खुनशी विचार मनात ठेऊन उपयोग नाही असेही सत्यजीत तांबे म्हणाले. अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेला तांबे यांनी प्रत्युत्तर दिलं.
बाळासाहेब थोरातांना संगमनेरमधूमन पराभवचा धक्का
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरात हे सलग 8 वेळा निवडून आले होते. मात्र, यावेली थोरातांना पराभवचा धक्का बसला आहे. यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचा मतदार संघ म्हणजे संगमनेर विधानसभा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे संगमनेर मतदार संघात एकहाती वर्चस्व राहिले होते. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यानंतर बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभेचे नेतृत्व करत आहेत, त्यामुळे याठिकाणी थोरात म्हणतील तीच पूर्व दिशा असे राजकारण रंगते. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sangamner Assembly Constituency Balasaheb Thorat : मोठी बातमी! काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा दावेदार पडला, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून पराभूत
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI