Ram Shinde On Ajit Pawar: कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो. हे आज दिसून आलंय, असं खळबळजनक विधान कर्जत-जामखेडमधील भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांनी केलं आहे. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं?, असं अजित पवार बोलले, म्हणजे हा सुनियोजित कट होता, असा आरोप राम शिंदे यांनी केला. अजित पवार आणि रोहित पवार () यांची आज भेट झाली. या भेटीनंतर राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


राम शिंदे काय म्हणाले?


राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी आगोदरच सांगितलंय. माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती मात्र अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय.  मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला. शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र ती फेटाळण्यात आलीय. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार आहे, हे काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे, असंही राम शिंदे यांनी सांगितले. 


अजित पवार-रोहित पवारांच्या भेटीत काय घडलं?


आज अजित पवार आणि रोहित पवार यांची कराडमधील प्रीतीसंगमावर भेट झाली. या भेटीत अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्किल टोला लगावला. ढाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, असा अजित पवारांनी रोहित पवारांना मिश्कील टोला लगावला. यावर सभा झाली असती तर निकाल वर-खाली झाला असता, अशी कबुली रोहित पवारांनी दिली. 


कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय-


कर्जत-जामखेडमध्ये महाविकास आघाडीचे आमदार रोहित पवार यांचा 1243 मतांनी विजय झाला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मतं मिळाली. तर महायुतीचे आमदार राम शिंदे यांना 1 लाख, 26 हजार 433 मतं मिळाली आहे. अपक्ष रोहित चंद्रकांत पवार यांना 3489 मतं मिळाल्याचा फटका रोहित पवार यांना बसल्याचं पाहायला मिळालं. तर अपक्ष राम नारायण शिंदे यांना 392 नोटाला 601 मतं मिळाली.



राम शिंदे काय म्हणाले?, Video:


संबंधित बातमी:


Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...