Balasaheb Thorat : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) माझ्या व प्रभावती घोगरे यांच्या भाषणांवर बंदी येण्याची शक्यता आहे. तशी तयारी देखील सध्या सुरु आहे. एवढी भीती नेमकी कशाची वाटली असे म्हणत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महायुतीवर टीका केली. अनेक कार्यकर्त्यांचे हातपाय तोडले. हे सगळं भीती बसवण्याकरता. मात्र तुम्ही घाबरायचं नाही काकीला मतदान करायचं. गुलामगिरीत राहायचं नाही. नाहीतर गुलामगिरी कायमची बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही असे थोरात म्हणाले. कटेंगे बटेंगे सोडा महागाईच बोला असा टोलाही थोरातांना लगावला. 


कटेंगे बटेंगे सोडा महागाईच बोला, हे बोललं तर अडचण येईल म्हणून वेगळ्या प्रश्नाकडे घेऊन जायचा  प्रयत्न विरोधकांचा सुरू असल्याचे थोरात म्हणाले. माझं गाव या मतदार संघात आहे.  मी इथला मतदार आहे. मला म्हणतात यांचा इकडे काय संबंध. आम्ही गणेश कारखाना अडचणीतून चांगला चालवला. आम्ही सिद्ध केलं की आम्ही करू शकतो. त्यामुळं 20 तारखेला आघाडीला मतदान नक्की द्या असे थोरात म्हणाले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजीत केलेल्या सभेत त्या ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. 


शिर्डी विधानसभा मतदारसंघाची लढत चुरशीची


नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाची लढत अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण या मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (भाजप) यांच्या विरुद्ध प्रभावती घोगरे (काँग्रेस) अशी लढत होत आहे. या लढतीकडं सूपर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँटे की टक्कर आहे. दोन्ही बाजूचे उमेदवारांनी विजयाची खात्री बाळगली आहे. त्यामुळं कोण विजयाचा गुलाल उधळमार हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबरला निकाल लागून सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे, सर्वच राजकीय पक्षांचे दौरे, संवाद, बैठका सुरु आहेत. या कालता राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. महायुतीची नेते पुन्हा महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार असल्याचा दावा करत आहेत, तर महाविकास आघाडीचे नेते राज्यात परिवर्तन होणार असल्याचे सांगत आहेत.


महत्वाच्या बातम्या :  


तुम्ही मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची सुद्धा बॅग तपासली पाहिजे, मगच तुम्ही निरपेक्ष ठराल : बाळासाहेब थोरात