Shirdi Sai Baba : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) तीन दिवसांत तब्बल सात कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत  2 कोटी 65 लाख, देणगी काउंटरवर एक कोटी 18 लाख, 25 लाख रुपये किमतीचे 472 ग्रॅम सोने आणि या व्यतिरिक्त साडेचार हजार किलो चांदीसुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.


शिर्डीच्या साईबाबा मंदिरात (Saiababa Mandir) गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे चार ते पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवात (Gurupuarnima) साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात येत आहे. उत्सवाच्या तीन दिवसांत सात कोटींचे दान जमा झाले असून तीन दिवसांत 2 लाख भाविकांनी साईदर्शन घेतले आहे. तीन दिवसांत दानपेटीत 2 कोटी 65 लाख, देणगी काऊंटरवर एक कोटी 18 लाख रुपये अर्पण करण्यात आले आहेत. तर मागील वर्षीपेक्षा दानात तीन कोटींची वाढ झाली आहे. 


देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डी साईमंदिरात (Sai Mandir) रोजच हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यंदा रामनवमीचा (Ramnavmi) सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राज्यभरातील मंदिरामध्ये भाविकांची रीघ आहे. अशातच साईचरणी देखील लाखो भक्त लीन होत असून दानपेटीतही भरघोस दान दिल जात आहे. शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी कोट्यवधींच दान प्राप्त झालं आहे. तीन दिवसांत 2 लाखांहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसांत साईबाबा संस्थानला एकूण सात कोटी नऊ लाख दान प्राप्त झालं आहे. यात दानपेटीत 2 कोटी 65 लाख रुपये जमा झाले आहेत. तर देणगी काउंटरव्‍दारे एक कोटी 18 लाख रुपये दान करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक भाविक हे ऑनलाईन देणगी देत असतात. यात डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डर आदींव्‍दारे 2 कोटी 18 लाख रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यासोबत 25 लाख रुपये किमतीचे 472 ग्राम सोने, तर 2 लाख 63 हजार रुपये किमतीची साडेचार हजार किलो चांदी अर्पण करण्यात आली आहे. या दाना व्‍यतिरिक्‍त उत्‍सव काळात सशुल्‍क तसेच ऑनलाईन पासेसव्‍दारे एकुण 67 लाख 33 हजार रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले आहे. 


समाजोपयोगी कामासाठी दानाचा उपयोग


दरम्यान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते.