Ashutosh Kale : 'परदेशात असताना अजित पवारांचा (Ajit Pawar) फोन आला होता. कुठे आहे? विचारलं मी त्यांना सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मिडियावर राज्यातील घडामोडी समजल्या. परदेशात जाण्यापूर्वी असं काही घडेल याची कल्पना सुद्धा नव्हती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी आहे. सोबत अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, यावर अनेकांचा विश्वास अद्यापही बसलेला नाही. यात कोपरगाव राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबासह परदेशात गेलेले कोपरगाव (Kopargaon) मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार भारतात येताच अजित पवारांच्या बरोबर उभे राहिले आहेत. खरं तर परदेश प्रवासात असताना विरोधी पक्ष ते सत्ताधारी पक्ष असा राजकीय प्रवास आशुतोष काळे यांचा झाला आहे. मात्र तत्पूर्वी त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलतांना दिली आहे.
आशुतोष काळे यावेळी म्हणाले की, परदेशात असताना अजित दादांचा फोन आला होता. कुठे आहे? विचारलं, मी त्यांना प्रदेशात असल्याचे सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी (maharashtra NCP crisis) समजल्या. त्यावेळी मनात आलं, असं कसं घडलं, दोन पक्ष सत्तेत असताना आपला तिसरा पक्ष त्यात कसा जाईल. मात्र काहीतरी विचार करूनच निर्णय झाला असेल असं मला वाटलं. दरम्यान परदेशातून आल्यानंतर अजितदादांना भेटलो. मतदार संघातील विकास काम मार्गी लागतील, असा आश्वासन दादांनी या यावेळी दिले. महाविकास आघाडीच्या काळातही दादांनी मला मदत केली होती. एवढं बोललो आणि त्या ठिकाणाहून अजित दादांना पाठिंबा देऊन मतदारसंघात आलो.
साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम ...
काळे पुढे म्हणाले की, काळे आणि पवार कुटुंबीयांचे तीन पिढ्यांचे संबंध माझे आजोबा शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून होते. पवार कुटुंब आज एकत्र आहे, वैचारिकदृष्ट्या दोन वेगळ्या भूमिका मात्र भविष्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा एक परिवार म्हणूनच समोर येईल, याची मला खात्री वाटते. पवार साहेबांना मानणारे आम्ही कार्यकर्ते असून वैचारिक दृष्ट्या सुद्धा एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तसेच अजित दादा बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद पवार साहेबांना सुद्धा भेटलो. साहेबांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही, याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला.
हे ही वाचा :