Ahmadnagar News : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pik Vima Yojna) खरीप हंगाम 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या पीक विम्याचा हप्ता जिल्हा बँक भरणार असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी केली. मात्र यावरून आता राजकारण सुरू झाल आहे. 


खरीप हंगामात (Kharip Season) पिकांच्या पेरणीपासून (Sowing) ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकुल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीक विमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. केवळ एक रुपया भरून पीकविम्यासाठी www.pmfby.gov.in पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे. त्यात आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती (Ahmednagar District Bank) सहकारी बँकेने स्व-निधीतून शेतकऱ्यांचा पीकविमा हप्ता भरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ठाकरे गटाच्या संदेश कार्ले यांनी टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेतील केवळ एक रुपया हप्ता भरून श्रेय घेण्यापेक्षा शासनाकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शून्य टक्के व्याजदराचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदेश कार्ले यांनी शिवाजी कर्डीले यांना केले आहे.


दरवर्षी शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीक कर्ज दिले जाते, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या शून्य टक्के व्याजदराच्या कर्जाचे तीन टक्के राज्य सरकार आणि तीन टक्के केंद्र सरकार व्याजदर भरते. बँक आधी शेतकऱ्यांकडून व्याज आकारते आणि नंतर शासनाकडून पैसे जमा झाल्यावर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करते. मात्र सध्या बँकेकडून या व्याजाच्या रकमेचा कोणताही ताळमेळ लागत नसल्याचे कार्ले यांचे म्हणणे आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्याजापोटी मागील तीन वर्षात 63 कोटी रुपये शासनाकडून जमा झाल्याचे कार्ले यांचे म्हणणे मात्र ज्या दिवशी शासनाकडून हे व्याजाचे पैसे जमा झाले. त्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. हे पैसे नेमकी कुठे आहेत, याची चौकशी व्हायला हवी, असं कर्डीले यांनी म्हंटले आहे.


ही कागदपत्रे आवश्यक 


दरम्यान पीक विमा योजनेसाठी हजारो शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. यासाठी महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 7/12 उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Pik Vima : पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांचा सहभाग, 31 जुलैपर्यंत योजनेत सहभागी होण्याचं कृषी आयुक्तांचं आवाहन