Imtiyaz Jaleel Vs Kalicharan Maharaj : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार तथा एमआयएमचे नेते इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) आणि कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. जलील आणि कालीचरण महाराज दोन्ही अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. कालीचरण महाराज लवकरच जेलमध्ये जाणार असल्याची टीका इम्तियाज जलील यांनी केली होती. तर त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना, "हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार" असे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. त्यामुळे इम्तियाज जलील विरुद्ध कालीचरण महाराज असा नवा वाद पाहायला मिळत आहे.
इम्तियाज जलील यांची टीका...
अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जलील यांनी कालीचरण महाराज यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, कोणीपण भगवा कपडा घालून महाराज होण्याचा प्रयत्न करतोय पण तसे होत नाही. अनेक गुन्हेगार भगवे कपडे घालून स्वतःला स्वामी म्हणून घेण्याला सुरुवात केली आहे. काही महाराज तोंड उघडलं की विष ओकतात. आसारामबापू यांचे किती चाहते होते. ते आल्यावर लाखो लोकं त्यांच्या मागे असायचे, पण आज ते जेलमध्ये आहेत. कालीचरण महाराज देखील किती दिवस बाहेर असतील मला माहित नाही, पण अशाप्रकारे असलेल्या महाराजांची जागा जेलमध्ये असणार आहे. मात्र जेव्हा पोलीस, सरकार , प्रशासन सक्तीने कायद्याचा वापर करतील त्यावेळी हे सर्व काही शक्य आहे. तसेच कालीचरण महाराज यांच्या भाषेत आम्ही देखील उत्तर देऊ शकतो, असेही जलील म्हणाले.
कालीचरण महाराज यांचे प्रत्युत्तर...
दरम्यान, जलील यांच्या टीकेला कालीचरण महाराज यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. "मला काय देणघेणं या लोकांशी. मी तुकडा टाकला की, लगेच भूकंतात. हाती चले बजार, कुत्ते भोंके हजार या नीतीने आम्ही चालत राहतो. कोणी निंदा कोणी मिंदा, आमचा सत्य सांगण्याचा धंदा असे कालीचरण म्हणाले. त्यामुळे जलील आणि कालीचरण महाराज यांच्यातील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.
आमदार-खासदारांनी पीन मारल्याने माझ्यावर गुन्हा दाखल
पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले की, काही दिवसांपूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तब्बल सहा महिन्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. काही आमदार-खासदार यांनी पोलिसांवर दबाव आणला आणि त्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. पण जन्मभर आम्ही जेलात राहण्यासाठी तयार आहोत, आम्ही मरायला तयार आहोत. तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आम्ही काहीही करायला तयार असल्याचं कालीचरण म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :