Maharashtra Ahmednagar Violence: अहमदनगरच्या (Ahmednagar News) शेवगावमध्ये (Shevgaon) काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti) शेवगाव शहरात मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाले आहेत. तर काही वाहनांचंही नुकसान झालं आहे. 


छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटानं दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मिरवणुकीवर दगडफेक केली गेली. यामुळे अफवांना पीक येऊन दोन्ही बाजूनं दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली. गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकानं पटापट बंद केली. जमावानं यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.


102 जणांवर गुन्हा दाखल


शेवगावमध्ये काल (रविवारी) झालेल्या दगडफेकीत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी 102 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 50 अज्ञात लोकांवरही रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या सध्या शेवगावमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हा वाद नेमका का सुरू झाला? याचं कारण पोलीस तापासानंतरच समोर येईल. सध्या शेवगावमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.


पाहा व्हिडीओ : Ahmednagar Voilence : छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात



नेमकं काय घडलं शेवगावात? 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "छत्रपती संभाजी महाराज्यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. जमावानं दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण सहभागी झाले होते. मिरवणूक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेनं एका गटानं दगडफेक केल्याची माहिती आहे. तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक केली त्यामुळे मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.