Balasaheb Thorat vs Vikhe patil and amol Khatal: राज्यात महाविकास आघाडी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बोगस मतदारांसह मतदार यादीतील घोटाळ्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. संगमनेर मतदारसंघात मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ असून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. याच मुद्द्यावरून आता थोरात विरुद्ध विखे -खताळ सामना रंगतांना दिसतोय.. मतदार यादीत साडेनऊ हजार नावांमध्ये घोळ असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केल्यानंतर मंत्री विखे पाटील आणि थोरातांचा पराभव करणारे आमदार अमोल खताळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Continues below advertisement

निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारयाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीत साडेनऊ हजारांहून अधिक नावांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. तक्रार करूनही काहीच दाद मिळत नसल्याने "निवडणूक आयोगाची बनवाबनवी सुरू आहे" अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही

दरम्यान, थोरात यांनी केलेल्या टीकेनंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, नगरपालिका निवडणुकीच्या प्रारूपतर यादीबाबत महायुतीकडून आम्ही त्या संदर्भात हरकती नोंदवल्या आहेत. गेली 40 वर्षे इथं बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगलबच्च्यांची दहशत होती. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही, त्यामुळे अशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवण्याचे काम करते.

Continues below advertisement

चोराच्या उलट्या बोंबा, विखे पाटलांची थोरातांवर खोचक टीका

दुसरीकडे, 40 वर्षात बाळासाहेब थोरात यांनी मतदार वाढवूनही त्यांचा पराभव झाला आणि त्याचे खापर मतदारांवर फोडत आहेत. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला राज्याचे जलसंपदा तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या