अहिल्यानगर : हैदराबाद गॅझेटनुसार (Hyderabad Gazetteer) इतरांना फायदा मिळत असेल, त्यातील एका-एका शब्दाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळावा अशी मागमी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण काढा म्हणणाऱ्यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे नाव न घेता दिला.
अहिल्यानगरमध्ये पार्थडी शेवगावात वंजारी बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. वंजारी समाजाला एसटी प्रवर्गातून आदिवासींचे आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्या आंदोलकांनी फोनवरून संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी जरांगेंना इशारा दिला.
Dhananjay Munde News : यांना टक्क्यातही ठेवणार नाही
आंदोलकांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. वंजारी समाजाचं दोन टक्के आरक्षण काढून घ्या म्हणणाऱ्यांचा टक्काही शिल्लक ठेवणार नाही अशी आक्रमक भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली. आंदोलकांना उपोषण सोडण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मुंडेंच्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Dhananjay Munde Phone Call : नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, "आम्हाला आधीच माहिती होतं की आम्ही एसटीमध्ये आहोत. तेलंगणाच्या बॉर्डरला लागूनच परळी आहे. आपले अनेक पाहुणे तिकडे एसटी प्रवर्गात आहेत, आणि आपण इकडे व्हीजेएनटीमध्ये आहोत हा दुर्दैवाचा विषय आहे. आता हे माहिती असूनही आपण कधीही विषय काढला नाही, कारण आपलं दोन टक्क्यात चांगलं चाललं होतं. जर त्या हैदराबाद गॅझेटनुसार इतर कुणाला जर आरक्षण मिळत असेल तर आम्हाला सुद्धा एसटीचा फायदा मिळाला पाहिजे."
ताकाला जाणं आणि भांडं लपवणं हा आमचा स्वभाव नाही. हैदराबाद गॅझेटमधील जर एका-एका शब्दाचा फायदा होत असेल तर तो आम्हालाही झाला पाहिजे. पण आता दोन टक्केही काढा असं काहीजण बोलत आहेत, त्यांचा टक्काही शिल्लक ठेवणार नाही असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. इथून पुढे लढा हा आमचा आहे. सरकार आपल्यासोबत आहे. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असंही धनंजय मुंडे यांनी आंदोलकांना सांगितलं.
Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून वादाची शक्यता
आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर मनोज जरांगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर त्याला गुलामाचं गॅझेट म्हणाले होते. आता त्यामध्ये फायदा दिसायला लागल्यावर ते काहीही चिवडतील अशा भाषेत जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.
ही बातमी वाचा: