Ahmednagar Lok Sabha Constituency : देशाचं नेतृत्व तिसऱ्यांदा मोदींच्या हाती द्यायचे आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. पुढील 5 वर्ष भारताला बलशाली करण्यासाठी सुजय विखेंना (Sujay Vikhe) मत द्या. एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचे (Ahmednagar) नाव 'अहिल्यानगर' (Ahilyanagar) होणारच आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी जाणीव पूर्वक अहिल्यानगर असं म्हणतो. एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की, अहमदनगरचे "अहिल्यानगर"च होणार आहे. देशाच नेतृत्व तिसऱ्यांदा मोदींच्या हाती द्यायचे आहे. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. त्यामुळे सुजय विखेंच्या रूपाने पंतप्रधान मोदींना मत मिळेल.
मोदींच्या गाडीत बसवून सर्व नागरिकांना विकासाकडे न्यायचंय
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) गाडीत बसवून सर्व नागरिकांना विकासाकडे न्यायचे आहे. सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे. मोदिजींच्या गाडीला सुजय विखेंची बोगी लागली की अहमदनगरची सर्व जनता त्या गाडीत बसेल आणि गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल, असेही त्यांनी म्हटले.
तरुण तडफदार खासदार म्हणून सुजय विखेंना मत द्या
आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे. दुसरी गाडी राहुल गांधींची आहे. त्या गाडीला कोणी इंजिन समजतच नाही. राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) रेल्वेला फक्त इंजिन आहे. सर्वसामान्य जनतेसाठी जागा नाही. मोदींने सांगितले मागील 5 वर्ष केवळ ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी आहे. पुढील 5 वर्ष भारताला बलशाली करण्यासाठी सुजय विखेंना मत द्या. तरुण तडफदार खासदार म्हणून सुजय विखेंना मत द्या, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा निलेश लंकेंवर निशाणा
नगरचा इतिहास आहे की, मतदार सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवारामागेच उभे राहतात. आता विरोधकांच्या लंकेचे दहन करायचे आहे. आता 'नो लंके ओन्ली विखे', ड्रामा करून खासदार होता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश लंकेंवर केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर