Ahmednagar News अहमदनगर : नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले की, अहमदनगर (Ahmednagar) शहराचे नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) होणारच, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ महायुतीची (Mahayuti) सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींचे "अहिल्यानगर" मध्ये स्वागत करतो. 2014 आणि 2019 ला याच मैदानावर मोदींची सभा झाली होती. त्यापेक्षा अधिक रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा झाली आहे. या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय झालाय. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की, त्यांच्या आशिर्वादाने लवकर जिल्ह्याचे नाव "अहिल्यानगर" होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न
ते पुढे म्हणाले की, निळवंडे धरणातून दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमचे नियोजन आहे. देशातील 4 महामार्ग नगर जिल्ह्याला जोडले आहेत. जिल्ह्यात 4 एमआयडीसी होणार आहे. मोदींच्या आशिर्वादाने जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा म्हणून होईल. येत्या काळात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अस त्यांनी म्हटले.
इतर महत्वाच्या बातम्या
'फडणवीस तुम्ही टुकार आणि नेभळट गृहमंत्री', दत्तात्रय भरणेंच्या व्हिडिओवरून राऊतांचा हल्लाबोल